Javed Akhtar : घर मे घुस के मारा.. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया चर्चेत

| Updated on: Feb 21, 2023 | 1:34 PM

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत टिप्पणी केल्यानंतर कंगनाने जावेद यांचं कौतुक केलंय. जावेद अख्तर हे पाकिस्तानमध्ये एका मेळाव्याला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला.

Javed Akhtar : घर मे घुस के मारा.. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया चर्चेत
Kangana Ranaut and Javed Akhtar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि गीतकार-लेखक जावेद अख्तर यांच्यातील मानहानीचा खटला गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या दोघांमध्ये कोर्टात वाद सुरू असला तरी कंगनाने आता सोशल मीडियावर त्यांचं कौतुक केलं आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबत टिप्पणी केल्यानंतर कंगनाने जावेद यांचं कौतुक केलंय. जावेद अख्तर हे पाकिस्तानमध्ये एका मेळाव्याला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. “हल्ल्याचे गुन्हेगार पाकिस्तानी होते, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची अपेक्षा भारतीयांकडून केली जाऊ शकत नाही”, असं ते म्हणाले. त्यावर कंगनाने ट्विट करत लिहिलं, ‘घर मे घुस के मारा’.

जावेद अख्तर यांचा व्हिडीओ पोस्ट करत कंगनाने लिहिलं, “जब मै जावेद साहब की पोएट्री सुनती हूँ तो लगता था ये कैसे माँ सरस्वतीजी की इन पे इतनी कृपा है, लेकीन देखो कुछ तो सच्चाई होती है इन्सान मै, तभी तो खुदाई होती है उनके साथ मै, जय हिंद! जावेद अख्तर साहब.. घर मै घुस कर मारा.. हाहाहाा” (मी जेव्हा त्यांच्या कविता ऐकते, तेव्हा देवी सरस्वतीची त्यांच्यावर किती कृपा आहे, असं मला वाटायचं. पण त्या व्यक्तीमध्ये असलेल्या खरेपणामुळेच देवसुद्धा त्यांच्यासोबत आहे.)

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

पाकिस्तानला जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अख्तर यांना त्यांच्यासोबत शांततेचा संदेश घेऊन जाण्यास सांगितलं गेलं. “भारतीयांना सांगा की पाकिस्तानी लोकांनी तुमचं प्रेमानं स्वागत केलं”, असं त्यांना म्हटलं गेलं. त्यावर अख्तर म्हणाले, “मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याची भीषणता प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती म्हणून त्या हल्ल्यांचे गुन्हेगार अजूनही पाकिस्तानात मोकळेपणे फिरतायत, याकडे भारतीयांनी दुर्लक्ष करण्याची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. हल्लेखोर हे नॉर्वे किंवा इजिप्तचे नव्हते. ते अजूनही तुमच्या देशात आहेत, त्यामुळे जर एखाद्या भारतीयाने याबद्दल तक्रार केली तर तुम्ही नाराज होऊ नका.”

भारताने याआधी अनेक पाकिस्तानी कलाकारांना आमंत्रित केलं आणि त्यांचा पाहुणचार केला. असं असलं तरी पाकिस्तानने लता मंगेशकर यांना कधीच आमंत्रित केलं नाही, असाही टोला त्यांनी लगावला.