बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील कंगना यांना विचारण्यात आलं की, पुरुषांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी महिलांसाठी धोकादायक ठरु शकते. यावर कंगना म्हणाल्या, ‘कोणत्याही रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजूने संतूलन असणं फार महत्त्वाचं आहे… अनेक नाती मोडतील जेव्हा महिला नात्यामध्ये स्वतःचं बलिदान देणं सोडतील…’ असं कंगना रानौत म्हणाल्या. शिवाय पुरुशांना कशा मुली अवडतात आणि कशा मुली आवडत नाहीत… याबद्दल देखील कंगना यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र कंगना रनौत यांची चर्चा रंगली आहे.
कंगना रनौत म्हणाल्या, ‘जर तुम्हीच सतत नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, हा सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे. समोरच्या व्यक्तीचं नात्यात 40 टक्के आणि तुमचं 60 टक्के योगदान असेल तरी नातं जास्त काळ टिकणार नाही… जर तुम्ही अधिक इमानदार, प्रामाणिक आहात तर तुमच्यामध्ये कधीच संतूलन राहणार नाही…’
पुढे मुलींसाठी कंगना म्हणाल्या, ‘दुसरा रेड फ्लॅग मुलींसाठी आहे…. कदाचित मुलींना विश्वास देखील बसणार नाही, पण यामध्ये तथ्य आहे. काही फरक नाही पडत तुम्ही किती स्मार्ट, किती यशस्वी आहात… पण एका पुरुषाला त्याच्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि यशस्वी स्त्री आवडत नाही. मी अनेकांच्या नात्यातील वाद पाहिले आहेत. त्यामुळे मी सांगू शकते. काही पुरुषांमध्ये मेल इगो नसू शकतो… पण अनेक पुरुषांना स्वतःपेक्षा स्मार्ट आणि यशस्वी मुली आवडत नाहीत…’ असं देखील कंगना म्हणाली.
लग्न अधिक काळ टिकून राहतात कारण महिला स्वतःचं नात्यात बलिदान देतात… पण जेव्हा कंगनाला पुरुष महिलांपेक्षा अधिक स्मार्ट नसेल तर असे पुरुष महिलांना अवडत नाहीत? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘कमी स्मार्ट आणि यशस्वी पुरुष महिलांचा चांगला मित्र होऊ शकतो पण जोडीदार नाही… एका पुरुषाला आदर मिळवण्यासाठी महिलांपेक्षा अधिक यशस्वी होण्याची गरज आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
कंगना रनौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर राजकारणाकडे स्वतःचा मोर्चा वळवला. कंगना पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजय मिळवला. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून कंगना यांचा विजय झाला आहे. आता कंगना बॉलिवूड करियर आणि राजकारणात पूर्ण व्यस्त आहेत.