‘त्याने मला ड्रग्ज दिले, कारमध्ये माझ्यावर…’, प्रसिद्ध सेलिब्रिटीवर कंगनाकडून गंभीर आरोप

| Updated on: Jan 13, 2025 | 3:48 PM

Kangana Ranaut: कंगना राणौत यांच्यावर आलेला 'तो' भयानक प्रसंग, प्रसिद्ध सेलिब्रिटीवर गंभीर आरोप करत म्हणाल्या, 'त्याने मला ड्रग्ज दिले, कारमध्ये माझ्यावर...', बॉलिवूडमध्ये कंगना यांनी केलाय अनेक गोष्टींचा सामना...

त्याने मला ड्रग्ज दिले, कारमध्ये माझ्यावर..., प्रसिद्ध सेलिब्रिटीवर कंगनाकडून गंभीर आरोप
Follow us on

करियरच्या सुरुवातीला अभिनेत्री कंगना राणौत यांच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली. पण कंगना यांचं कोणतंच नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना कंगना हिच्या नावाची चर्चा अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत रंगू लागली. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केलं. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हृतिक सोबत घटस्फोट झाल्यानंतर कंगना हिने स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्याला डेट करण्यास सुरुवात केली. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आदित्य पंचोली आहे. पण आदित्य सोबत देखील अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. कंगना यांनी आदित्यवर अनेक गंभीर आरोप केले.

कंगना यांनी आदित्य यांच्यावर मारहाण केल्याचे आरोप केले. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. अभिनेत्री फक्त 17 वर्षांची असताना आदित्य याने कंगना यांना मारहाण केली होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर कंगना यांची बहीण रंगोलीने आदित्य पांचोलीवर कंगनाकडून एक कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला होता.

विवाहित अभिनेत्यासोबत असलेल्या नात्यावर कंगना म्हणाल्या, ‘तो माझ्या बापाच्या वयाचा होता. त्याने मला जमीनीवर जोरात आपटलं. ज्यामुळे मी जखमी झाली होती. मी रक्तबंबाळ अवस्थेत होती. 17 वर्षांची असताना त्याने माझ्यावर अत्याचार केले…’ असं देखील कंगना म्हणाली.

कंगना यांच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना…

कंगना म्हणाल्या, ‘मी फक्त 17 वर्षांची होती. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिक्स केले आणि कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला. नको त्या अवस्थेत माझे फोटो काढले आणि मला ब्लॅकमेक करत राहिला…’ आदित्य आणि जरीनानेही कंगनावर मानहानीचा खटला दाखल केला होता. कंगनानेही केस दाखल केली.

सांगायचं झालं तर, आदित्य आणि कंगना यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. दोघांमध्ये तब्बल 21 वर्षाचं अंतर होतं. तेव्हा कंगना यांनी बॉलिवूडमध्ये करियरला सुरुवात केली होती. तेव्हा कंगना – आदित्य यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. पण ब्रेकअपनंतर आदित्य पंचोली याने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप लावले.