मुंबई : कंगना रनौत सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही. तसेच, ती तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. कंगनाला तिची मेक्सिकोची सुट्टीची आठवण येत आहे. तिने बिकिनीवरील एक फोटो नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगना बीचवर बसलेली दिसत आहे. कंगना नेहमीच साडी आणि सूटमधील बरेच फोटो शेअर करते. मात्र, आज कंगनाने बिकिनीवरचा फोटो शेअर केला आहे, त्यावरून तिला आता ट्रोल केले जात आहे. (Kangana Ranaut’s bikini photo troll)
Good morning friends, one of the most exciting places that I visited in my life is Mexico, beautiful but an unpredictable place, here’s a picture from Tulum a little island in Mexico ❤️ pic.twitter.com/8b0M7ymMiX
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 23, 2020
हा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले आहे की, सुप्रभात मित्रांनो माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक म्हणजे मेक्सिको, हे एक सुंदर ठिकाण आहे. हा फोटो मेक्सिकोमधील तुलम या बेटाचा आहे. कंगनाला आता या फोटोमध्ये घातलेल्या कपड्यांवरून ट्रोल केले जात आहे.
एका ट्रोलर्सने कंगनाच्या या फोटोवर लिहले आहे की, तुमच्याकडे काही कपडे शिल्लक नाहीत का? तर दुसर्याने लिहिले की, आता हेच आयुष्यात राहिले आहे. जगाला सांगा की, आपण किती सभ्य आहात आणि भक्तांना सांगा की, तुम्ही किती देसी आहात. असेही तुमच्याकडे कुठलाच चित्रपट नाही. त्याच वेळी एकाने लिहिले संस्कारी क्वीन, काही लोक कंगनाला देवाकडून बुध्दी देण्याचीही मागणी करीत आहेत. एक ट्रोलर्स म्हणाला की, आम्ही तुमचे समर्थन करतो, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या संस्कृतीच्या विरोधात जा, थोडेसे लाजा तर दुसरा ट्रोलर्स म्हणतो की, देवा हिला थोडी अक्कल द्या.
संबंधित बातम्या :
Google Search 2020 : हे तर नवलच! 2020मध्ये नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीबाबत गुगलवर सर्वाधिक सर्च
Mission Majnu |‘मिशन मजनू’ चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!
(Kangana Ranaut’s bikini photo troll)