बंगळुरु : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांचा बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयात उपचार सुरु होता. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
Apart from the shocking tragedy that @PuneethRajkumar ‘s sudden death is, it is also a scary and terrifying eye opening truth that any of us can die anytime ??? So it is best to live life on a fast forward mode , while we are still alive???
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) October 29, 2021
एएनआयच्या वृत्तानुसार, सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Actor Puneeth Rajkumar(in pic)was admitted after suffering chest pain at 11.30 am.Trying our best to treat him.His condition is serious.Can’t say anything as of now.His condition was bad when brought to hospital, treatment on in ICU: Dr Ranganath Nayak, Vikram Hospital, Bengaluru pic.twitter.com/Gw4Xp5r5pV
— ANI (@ANI) October 29, 2021
पुनीत राजकुमार हा 46 वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1985 मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते. त्याच फिल्मसाठी त्यांची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता.
संबंधित बातम्या :
Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याचा प्रचंड धक्का; शहनाजला दु:ख आवरेना