Good News | कपिल शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!

| Updated on: Feb 01, 2021 | 9:59 AM

कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) घरी आणखी एक छोटा पाहुणाचे आगमन झाले आहे. 1 फेब्रुवारीला पहाटे त्याच्या पत्नी गिन्नी चतरथने मुलाला जन्म दिला.

Good News | कपिल शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!
Follow us on

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) घरी आणखी एका छोटा पाहुण्याचे आगमन झाले आहे. 1 फेब्रुवारीला पहाटे त्याच्या पत्नी गिन्नी चतरथने मुलाला जन्म दिला. कपिल शर्माने सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांनासोबत शेअर केली आहे. कपिलने बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. कपिल शर्मा एक मुलगी देखील आहे. तिचे नाव अनायरा असे आहे काही दिवसांपूर्वी अनायराच्या वाढदिवसाचे फोटो कपिलने सोशल मीडियावर शेअर केले होते. (Kapil Sharma became a father for the second time, giving information to fans on social media)

द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला आहे. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात होते.

कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे. कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे अलिकडेच कृष्णा अभिषेकने सांगितलं. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर सांगण्यात आले.

परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.

संबंधित बातम्या : 

Budget 2021 | निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यात मनोरंजन जगतासाठी काय?

IMDB Rating : पाहा आयएमडीबी रेटिंगमध्ये कोणत्या वेबसीरिजचा जलवा

शाहरुख-दीपिकापेक्षा मोठा झाला झाला जॉन अब्राहम? पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना…!

(Kapil Sharma became a father for the second time, giving information to fans on social media)