मुंबई : लाखो लोकांना खळखळून हसायला लावणारा ग्रेट कॉमेडियन कपील शर्मा (Kapil Sharma) सर्वांनाच माहिती आहे. फक्त भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. त्याचा हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धीचे लाखो लोक दिवाने आहेत. दरम्यान कपील शर्मा संबंधीची एक मोठी माहिती समोर आली आहे. लवकरच त्याच्या जीनवानवर आधारित असलेला म्हणजेच कपिल सर्माचा एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मृगदीपसिंह लांबा ( Mrigdeep Singh Lamba) दिग्दर्शित करणार असून त्याची निर्मिती महावीर जैन (Mahavir Jain) करणार आहेत.
कपील शर्माच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे नाव फनकार असल्याचे खुद्द मृगदीप सिंह लांबा यांनी सांगितले आहे. सध्या मृगदीप फुकरे-3 या चित्रपटावर काम करत आहेत. मात्र शुक्रवारी त्यांनी कपिल शर्माच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करणार असल्याचे जाहीर केले. कपिल शर्माच्या जीवनाचा उलगडा करणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र हा चित्रपट कोण करणार आहे, त्याचे दिग्दर्शन कोण करेल, याबाबत अस्पष्टता होती. मात्र मृगदीप यांच्या घोषणेनंतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. कपीलचे जीवन उलगडून दाखवणाऱ्या या बायोपिकचे नाव फनकार असे असेल.
कपिल शर्मच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात नेमक्या कोणत्या मुद्द्यावर भर दिला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या चित्रपटात कपिल शर्माचे पूर्ण जीवन उलगडवून दाखवले जाणार आहे. त्याने केलेली मेहनतदेखील या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
दरम्यान, कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवरदेखील आपला शो घेऊन येत आहे. नेटफिल्कसने कपिल शर्मासोबतचे एक टीजर लॉन्च केले असून आय अॅम नॉट डन स्टील असे कॅप्शन देण्यात आले. या शोमध्ये कपिल शर्मा आपल्या आयुष्यातील काही मजेदार किस्से तसेच चटपटीत विषयावर भाष्य करताना दिसणार आहेत.
इतर बातम्या :
Happy Birthday | संपूर्ण कुटुंब संगीत क्षेत्रात असतानाही नील नितिन मुकेशने केली अभिनयाची निवड
Hrithik Roshna | एक्स वाईफ सुजैननंतर हृतिक रोशनही कोरोना पॉझिटिव्ह, आता कशी आहे प्रकृती?