अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेग्स केस प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने संबंधीत प्रकरणी मोठा निर्णय सुनावला आहे. ड्रग्स प्रकरणातून अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री विरोधात सबळ पुरावे नसल्यमुळे ममता कुलकर्णी हिच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. अभिनेत्री एक याचिका दाखल केली आहे आणि ड्रग्स प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे… असं याचिकेत सांगितलं होते. अखेर कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवा निर्णय घेऊन कुलकर्णी हिची ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. कारण एफआयआरमध्ये तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांशिवाय अभिनेत्रीविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता.
ममता कुलकर्णी हिच्याविरुद्ध सुरू असलेला 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचा खटला हायकोर्टाने रद्द केला आहे. ममता हिच्यावर पती विकी गोस्वामीसह ड्रग्स तस्करीचा आरोप होता. यावर कोर्टाने निकाल सुनावला आहे. ममता हिच्याविरोधात पुरावे नाहीत. म्हणून हे प्रकरण रद्द करण्यात येत आहे… असा निकार कोर्टाने सुनावला. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशमुख यांच्या खंडपीठाने कुलकर्णी हिच्यावरील ड्रग्जचा खटला रद्द केला आहे.
ममता कुलकर्णी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, हिंदी सिनेविश्वात अनेक वर्ष काम केल्यानंतर अभिनेत्रीने आंतरराष्ट्रीय ड्रग लॉर्ड विकी गोस्वामी याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री पतीसोबत केनिया याठिकाणी शिफ्ट झाली. त्यानंतर काही काळात ड्रग्स प्रकरणार अभिनेत्रीचं देखील नाव समोर आलं. अनेक वर्षांनंतर आता ड्रग्स प्रकरणातून ममता हिची निर्दोष मुक्तता झाली आहे.
एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांमध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये ममता कुलकर्णी हिची क्रेझ होती. ममता कुलकर्णी हिने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले. अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘करण अर्जुन’ सिनेमात ममताच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण 2016 मध्ये ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या ममता कुलकर्णी हिला 2024 मध्ये दिलासा मिळाला आहे.
ममता कुलकर्णी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अभिनेते राज कुमार आणि नाना पाटेकर यांच्यासोबत 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमात काम केलं. त्यानंतर ममता ‘करण अर्जुन’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ यांसारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसली.