दाऊदच्या शुटरसोबत खास कनेक्शन, आता कुठे आहे ममता कुलकर्णी? राकेश रोशन म्हणाले…

| Updated on: Nov 27, 2024 | 10:07 AM

बॉलिवूड गाजवणारी ममता कुलकर्णी दाऊदच्या शुटरसोबत अडकली प्रेमाच्या जाळ्यात, आता कुठे आणि कसं आयुष्य जगतेय अभिनेत्री? राकेश रोशन यांनी दिली मोठी माहिती..., अभिनेत्री आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

दाऊदच्या शुटरसोबत खास कनेक्शन, आता कुठे आहे ममता कुलकर्णी? राकेश रोशन म्हणाले...
Follow us on

Mamta Kulkarni: 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण अर्जुन’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता 2025 मध्ये ‘करण अर्जुन’ सिनेमाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. अशात दिग्दर्शकांना सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या आठवड्यात सिनेमात जवळपास 1 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर दुसरीकडे सिनेमाचे दिग्दर्शक राकेश रोशन सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण आता अभिनेत्री कुठे आणि कसं आयुष्य जगतेय कोणालाच माहिती नाही.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी ममता कुलकर्णी हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत राकेश रोशन यांना अभिनेत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘ममता कुलकर्णीच्या संपर्कात गेल्या अनेक वर्षांपासून मी नाही. मला नाही माहिती ती कुठे आहे…’ असं राकेश रोशन म्हणाले.

दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांच्याबद्दल देखील राकेश रोशन यांनी वक्तव्य केलं. राकेश रोशन म्हणाले, ‘अमरीश पुरी आज असते तर मला प्रचंड आनंद झाला असता. ज्याप्रकारच्या भूमिका अमरीश पुरी यांनी साकारल्या आहेत, तशा भूमिका कोणीच साकारू शकत नाही…’ असं म्हणत त्यांनी अमरीश पुरी यांचं कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

ममता कुलकर्णी…

अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 22 वर्षांपूर्वी अभिनेत्रीने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी तुम कभी हम’ सिनेमानंतर अभिनेत्री कोणत्याच सिनेमात झळकली नाही. एक काळ असा होता जेव्हा ममता प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होती. दाऊदच्या शुटरसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं.

ममता कुलकर्णी हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘आशिक आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक़्त हमारा है’, ‘करण अर्जुन’ आणि ‘चाइना गेट’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रूी झळकली. रिपोर्टनुसार, 2014 मध्ये ममताने सांगितले होतं की, तिने इंडस्ट्री सोडली आणि अध्यात्माच्या मार्गाला लागली आहे.