Karan Deol | सनी देओल याचा लेक संतापला, थेट म्हणाला, नेहमीच स्टार किड्सलाच…

| Updated on: Oct 11, 2023 | 9:20 PM

सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. सनी देओल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना दिसला.

Karan Deol | सनी देओल याचा लेक संतापला, थेट म्हणाला, नेहमीच स्टार किड्सलाच...
Follow us on

मुंबई : गदर 2 या चित्रपटामुळे सनी देओल (Sunny Deol) हा प्रचंड चर्चेत आहे. गदर 2 चित्रपटाने तूफान कामगिरी केलीये. गदर 2 हा सनी देओल याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच ठरलाय. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळाली. गदर 2 (Gadar 2) चित्रपटात सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेल ही मुख्य भूमिकेत दिसली. सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. चाहत्यांनी या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले.

गदर 2 हा चित्रपट 60 कोटींमध्ये तयार झाला. चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तब्बल 600 कोटींची कमाई केलीये. हा चित्रपट सुपरहिट ठरलाय. गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल हा आपल्या कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसला. सनी देओल हा वडील धर्मेंद्र यांच्यासोबत काही दिवस विदेशात होता. यावेळीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे देखील काही दिवसांपूर्वी आयोजन करण्यात आले. गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला बाॅलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावेळी सनी देओल याचे संपूर्ण कुटुंबिय देखील उपस्थित राहिले.

सनी देओल याचा लेक राजवीर देओल याने नुकताच दोनो या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये करण देओल हा थेट नेपोटिझम आणि स्टार किड्स यावर बोलताना दिसला. करण देओल थेट म्हणाला की, स्टार किड्सला नेहमीच टार्गेट केले जाते. त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचे प्रेशर नक्कीच बघायला मिळते.

पुढे करण देओल म्हणाला की, मुळात म्हणजे फिल्मी परिवारांकडे लोकांच्या अधिक नजरा असतात. इतकेच नाही तर यांच्यावर टिका देखील कायमच केली जाते. मुळात म्हणजे स्टार किड्सकडून खूप जास्त अपेक्षा केल्या जातात, असेही करण देओल याने म्हटले आहे. करण देओल म्हणाला, लोक फक्त खाली दाखवण्याचा प्रयत्न अधिक करतात.