रिॲलिटी शो हा प्रकार आपल्याकडे नेहमी गाजतो. लोकांना हा प्रकार प्रचंड आवडतो. समजा डान्सचा रिॲलिटी शो असेल तर त्यात नुसता डान्स होत नाही. अनेक प्रकारची मजा मस्ती इथे होत असते. त्यामुळेच हे रिॲलिटी शो लोकांच्या जवळचे असतात. त्यात असणारे जज सुद्धा जर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि लोकांना आवडणारे असतील तर वाह! मज्जाच मज्जा!
असाच एक शो आहे ‘झलक दिखला जा 10’ ज्याचे जज आहेत करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही. आता बघा करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही हे किती फेमस आहेत.
यांच्या आयुष्यात लोकांना फार रस आहे. मग अर्थातच नुसता डान्स काय लोकं त्यांच्या आयुष्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला हा शो बघतात.
नुकताच या शो मध्ये ‘कपूर स्पेशल’ एपिसोड झाला. यात बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळाल्या. करण जोहर आणि कपूर फॅमिलीचे चांगले संबंध उघड आहेत. सगळ्यांना माहित आहे त्यांच्यात किती जवळीक आहे.
झालं तर मग बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर ‘झलक दिखला जा 10’ च्या कपूर स्पेशल एपिसोडला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या. करणने नीतूसोबत स्टेजवर खूप मस्ती केली आणि कपूर कुटुंबाशी संबंधित मजेदार गोष्टीही विचारल्या.
करणने नीतूला विचारले की करीना कपूर तिचा मोठा मुलगा तैमूर अली खानच्या आयाला 1 कोटींपेक्षा जास्त पगार देते का? तसं असेल तर तैमुरची आया म्हणून काम करायलाही ती तयार आहे.
यावर उत्तर देताना नीतू म्हणते, “तुला काय करायचं आहे?” ती दोन कोटी किंवा पाच कोटी देत असेल, मला कसं कळणार.