मुंबई | अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमाचा ट्रेलर काही प्रेक्षकांना आवडला आहे, तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पण प्रदर्शनापूर्वीच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र ‘रॉकी और राणी की प्रेमे कहाणी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमातील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ट्रेलरमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये रणवीर आलिया हिच्या घरी ३ महिन्यांसाठी रहायला जातो. तेव्हा अभिनेत्याला रवींद्रनाथ टागोर यांचा फोटो दिसतो.
रवींद्रनाथ टागोर यांचा फोटो पाहिल्यानंतर अभिनेता राणी (आलिया भट्ट) हिचे आजोबा म्हणून त्यांना नमस्कार करतोय. ट्रेलरमधील हा सीन विनोदी अंदाजात चित्रीत करण्यात आला आहे. ज्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मु्द्दी उचलून घरला आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत. शिवाय बॉलिवूड भूतकाळातून कधीही शिकू शकत नाही… अशी टीका नेटकऱ्यांनी सिनेमाचा ट्रेलर पाहून केली आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान करूच कसा शकता? भारताच्या इतिहासात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि अशा व्यक्तीचा अपमान आम्ही सहन करणार नाही.. असं देखील नेटकरी म्हणाले आहेत.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या माध्यामातून दिग्दर्शक करण जोहर याने सात वर्षांनंतर दिग्दर्शनात पुन्हा पदार्पण केलं आहे. पण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर करण याच्यावर सडकून टीका होत आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमाची कथा एका आलिया – रणवीर यांच्या प्रेमकहाणी भोवती फिरत आहे. सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया, रणवीर यांच्यासोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.