अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा खरा चेहरा जगासमोर, हैराण करणारा खुलासा

| Updated on: Dec 02, 2023 | 2:28 PM

अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झालीये. मात्र, बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून यांच्यामध्ये मोठे वाद बघायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिता हिने विकी जैन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले, अंकिताच्या आरोपानंतर लोक हैराण झाले.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा खरा चेहरा जगासमोर, हैराण करणारा खुलासा
Follow us on

मुंबई : बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे सतत होताना दिसत आहेत. बिग बाॅस 17 ला अजूनही म्हणावा तसा धमाका टीआरपीमध्ये करता नाही आला. नुकताच बिग बाॅस 17 ला करण जोहर हा होस्ट करताना दिसला. यावेळी करण जोहर याने अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची पोलखोल केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर करण जोहर याचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अंकिता आणि विकी जैन यांचा गेम प्लॅन घरातील सदस्यांसमोर करण जोहर याने सांगितला.

करण जोहर म्हणाला की, अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बाॅस 17 चे घर कंट्रोल करू इच्छित आहेत. इतकेच नाही तर याबद्दल अंकिता जवळ बोलताना अनेकदा विकी जैन हा दिसला. करण म्हणाला, विकी जैन हा सतत अंकिता हिला संपूर्ण घर कंट्रोल करण्याबद्दल बोलत आहे. अभिषेक कुमार हा तर पहिल्यांदाच यांच्या कंट्रोलमध्ये आहे.

मनारा चोप्रा यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीये. मनारा चोप्रा हिला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप जास्त प्रयत्न अंकिता आणि विकी यांच्याकडून केले जात आहेत. मात्र, ती या दोघांचे अजिबातच काहीच ऐकत नाहीये. अंकिता आणि विकीला संपूर्ण घर कंट्रोल करायचे आहे. यावर अनेक प्रश्न अंकिता हिला विचारताना करण जोहर हा दिसला.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्याबद्दलचा हा खुलासा ऐकून घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. करण जोहर याने केलेल्या खुलाश्यानंतर लोक सतत अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यावर टिका करताना दिसत आहेत. करण जोहर याने चांगलाच विकी आणि अंकिताचा क्लास लावला.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये घरात मोठा वाद हा बघायला मिळाला. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने विकी जैन याच्याबद्दल मोठे खुलासे केले आणि गंभीर आरोपही केले. विकी जैन याने अंकिताच्या आणि त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला, ज्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टिका केली.