Karan Johar | ‘या’ स्टार किड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार करण जोहर, लोकांचा संताप, थेट म्हणाले, नेपोटिझमचा गॉड फादर

| Updated on: Jul 20, 2023 | 3:00 PM

चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. लोक करण जोहर याच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करतात. आता करण जोहर याच्या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट पुढे आलीये. आता करण जोहर याच्या आगामी चित्रपटातून एका स्टार किड्सला लाॅन्च केले जाणार आहे.

Karan Johar | या स्टार किड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार करण जोहर, लोकांचा संताप, थेट म्हणाले, नेपोटिझमचा गॉड फादर
Karan Johar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचा चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतो. नेहमीच करण जोहर हा सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर असतो. विशेष म्हणजे करण जोहर याला स्टार किड्सचा (Star Kids) गॉड फादर देखील म्हटले जाते. कारण जान्हवी कपूर, वरूण धवन, आलिया भट्ट, अनन्या पांडे (Ananya Pandey) अशा स्टार किड्सला त्याने बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. बरेच लोक म्हणतात की, करण जोहर हा प्रेक्षकांसाठी चित्रपटाची निर्मिती अजिबात करत नाही. तो फक्त आणि फक्त स्टार किड्स लाॅन्च करण्यासाठीच चित्रपट तयार करतो. इतकेच नाही तर त्याचा शो काॅफी विथ करणमध्येही तो नेहमीच याबद्दल बोलताना देखील दिसलो. यामुळेच तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो.

आता देखील करण जोहर हा अजून एका स्टार किड्सला लाॅन्च करणार आहे. करण जोहर यावेळी संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर हिला त्याच्या चित्रपटातून लाॅन्च करणार आहे. विशेष म्हणजे फक्त शनाया कपूर हिच नाही तर शनाया कपूर हिच्यासोबत अजून काही स्टार किड्सला तो त्याच्या आगामी चित्रपटातून लाॅन्च करणार असल्याचे सांगितले जातंय.

नुकताच आता स्टूडेंट ऑफ द ईअर या चित्रपटाचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनाया कपूर हिला याच चित्रपटातून लाॅन्च केले जाणार आहे. याची पूर्ण तयारी देखील सुरू आहे. फक्त शनाया कपूर हिच नाही तर अजून काही मोठ्या स्टारच्या मुलांना या चित्रपटात काम करण्याची संधी ही दिली जाणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

यामुळेच आता परत एकदा करण जोहर हा लोकांच्या निशाण्यावर आलाय. सोशल मीडियावर लोक कमेंट करत करण जोहर याला टार्गेट करताना दिसत आहेत. करण जोहर यामुळे वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. एकाने पोस्ट शेअर करत म्हटले की, अजून काही स्टार किड्स बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणे राहिले असतील तर सांग आणि एकदाच कर असेही तू स्टार नेपोटिझमचा गाॅड फादर आहेस.

आता सोशल मीडियावर स्टार किड्सचा गॉड फादर, नेपोटिझमचा गाॅड म्हणून करण जोहर याचा टार्गेट केले जात आहे. स्टूडेंट ऑफ द ईअर या चित्रपटातून करण जोहर याने आलिया भट्ट आणि वरून धवन यांना लाॅन्च केले आहे. आता लवकरच करण जोहर याच्या राॅकी आैर राणी की प्रेम कहानी या चित्रपटात आलिया भट्ट ही काम करताना दिसणार आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.