मुंबई : करण जोहर हा कायमच चर्चेत असतो. नेटकरी करण जोहर (Karan Johar) याला नेहमीच टार्गेट करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे मुख्य भूमिकेत दिसले. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले. विशेष म्हणजे हा चित्रपट हिट ठरला. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या एका गाण्याचे शूटिंग आलिया भट्ट हिने राहा हिच्या जन्मानंतर कश्मीर येथे केले. यावेळीच्या एक किस्सा देखील करण याने सांगितला.
नुकताच आता करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये करण जोहर हा काही मोठे खुलासे करताना दिसला. करण जोहर याचे हे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी करण जोहर याने चक्क रणबीर कपूर याच्याबद्दल हा खुलासा केला आहे. करण जोहर याच्या या बोलण्यानंतर अनेक चर्चा या रंगल्याचे बघायला मिळतंय.
करण जोहर याने म्हटले की, रणबीर कपूर हा खूप जास्त शांत व्यक्ती आहे. विशेष म्हणजे त्याला चित्रपटाच्या सेटवर 14 तास जरी वाट बघायला लावली तरीही तो अजिबातच चिडत नाही. बाॅलिवूड क्षेत्रातील तो एक एकमेंव अभिनेता आहे जो इतका जास्त शांत आहे. विशेष म्हणजे फक्त शांतच नाही तर तो खूप जास्त रिअल व्यक्ती आहे. त्याला कोणत्याच गोष्टीचा गर्व अजिबातच नाहीये.
विशेष बाब म्हणजे रणबीर कपूर याचा कोणीही पीआर नाही किंवा त्याला मॅनेजर देखील नाहीये. सर्व गोष्टी तो एकटाच करतो. जर आपण त्याला चित्रपटासाठी तारीख मागण्यासाठी गेलो तर तो त्याचा मोबाईल काढतो आणि या तारखेला तो कुठे बिझी आहे हे सांगतो. म्हणजेच तो जो काही करतो त्याचा हिंमतीवरच करतो.
रणबीर कपूर याच्याकडे पीआर आणि मॅनेजर नसल्याचे ऐकल्यापासून चाहतेही हैराण झाले आहेत. रणबीर कपूर याने चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मोठा खुलासा केला होता. रणबीर कपूर म्हणाला की, आलिया आणि राहा सध्या कश्मीर येथे गेल्या आहेत. तिथे आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. मी आलिया आणि राहा या दोघींनी मिस करत आहे.