Karan Johar | संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, करण जोहर याने केली पोलखोल

| Updated on: Sep 21, 2023 | 3:16 PM

करण जोहर हा नेहमीच त्याच्या विधानामुळे जोरदार चर्चेत असतो. करण जोहर याचा काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला.

Karan Johar | संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, करण जोहर याने केली पोलखोल
Follow us on

मुंबई : करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षांनंतर करण जोहर चित्रपट डायरेक्शन करताना दिसला. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड मोडले. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये करण जोहर (Karan Johar) याची सर्वात आवडती अभिनेत्री अर्थात आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत दिसली. आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह हा देखील मुख्य भूमिकेत दिसला. आलिया आणि रणवीर यांच्या जोडीने धमाका केला आणि चित्रपट हिट ठरला.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या यशानंतर करण जोहर हा तूफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये करण जोहर हा थेट सलमान खान याच्याबद्दल मोठा खुलासा करताना दिसला. इतकेच नाही तर सलमान खान याच्यामुळे आपल्यावर थेट रडण्याची वेळ आल्याचे सांगताना देखील करण जोहर दिसला.

आता नुकताच करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये थेट करण जोहर हा संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल खुलासा करताना दिसला. यावेळी करण जोहर याला विचारण्यात आले की, रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या यशानंतर तुला संजय लीला भन्साळी यांचा फोन आला का? यावर करण जोहर याने मोठा खुलासा केला.

करण जोहर हा म्हणाला की, मला रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या यशानंतर खूप लोकांचे फोन आले. सर्वजण माझे काैतुक करताना दिसले. मात्र, मला संजय लीला भन्साळी यांचा फोन नाही आला. मुळात म्हणजे मीच खूप कमी लोकांना फोन करतो. मला इतर वेळी संजय लीला भन्साळी यांचा फोन येतो. मात्र, चित्रपटाच्या यशानंतर नाही आला.

संजय लीला भन्साळी यांनी करण जोहर याला फोन न केल्याने चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. पुढे करण जोहर म्हणाला की, कोणत्याच चित्रपटानंतर मला कधी संजय लीला भन्साळी फोन नाही करत. करण जोहर हा नेहमीच त्याच्या विधानामुळे जोरदार चर्चेत असतो. करण जोहर याने आतापर्यंत एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे.

करण जोहर हा नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. करण जोहर याच्यावर सतत टिका केली जाते. इतकेच नाही तर थेट करण जोहर याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. स्टार किड्सला लाॅन्च करण्याचा नेहमीच करण जोहर याच्यावर आरोप केला जातो.