मुंबई : कॉफी विथ करण सीजन 8 मुळे करण जोहर हा सध्या चर्चेत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये करण जोहर याच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला. शाहरुख खान हा कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सहभागी होणार की, नाही यावर करणने भाष्य केले. करण जोहर हा म्हणाला की, शाहरुख खान आणि कॉफी विथ करण शोचे जुने नाते आहे. तो कायमच या शोसोबत जोडला गेलाय. परंतू सध्या थोडा वेळ शाहरुख खान याला देण्याची गरज आहे.
शाहरुख खान हा कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सहभागी होणार की नाही यावर अखेर मोठा खुलासा झालाय. मात्र, करण जोहर याचे हे बोलणे ऐकून शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळतंय. कारण करण जोहर हा थेट म्हणाला की, कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये शाहरुख खान हा सहभागी होणार नाहीये.
करण जोहर पुढे म्हणाला की, मी आताच सांगू शकत नाही शोबद्दल अधिक. सोशल मीडियावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये हे लोक धमाल करताना दिसत आहेत. दीपिका आणि रणवीर हे कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये सहभागी झाले. यावेळी काही मोठे खुलासे देखील करण्यात आले.
कॉफी विथ करण सीजन 8 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. कॉफी विथ करण सीजन 8 धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये बाॅलिवूडचे कलाकार हे सहभागी होणार आहेत. इतकेच नाही तर काही स्टार किड्सला देखील या सीजनमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.
कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये कंगना राणावत ही सहभागी होणार नसल्याचे कळाल्यापासून करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये कंगना सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, हे स्पष्ट झालंय की, कंगना राणावत ही कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये दिसणार नाहीये. यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय.