मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक चर्चा तूफान रंगत होती की, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे ब्रेकअप झाले. करण कुंद्रा (Karan Kundrra) याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये एक शायरी होती, या शायरीवरूनच अनेकांनी यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले होते. यानंतर चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या जोडीला चाहते मोठ्या प्रमाणात प्रेम देतात. यांचे ब्रेकअप (Breakup) झाल्याचे कळताच चाहत्यांना धक्का बसला. मात्र, त्यानंतर थेट हे दोघे मुंबईतील एका मंदिरामध्ये स्पाॅट झाले.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे मंदिरामधील फोटो पाहून हे स्पष्ट झाले की, यांचे ब्रेकअप झाले नाही. नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे हे सीजन टीआरपीमध्ये टाॅपलाच राहिले. नुकताच आता नागिन 6 हे बंद झाले असून नागिन 7 बद्दल देखील अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आले आहे.
नागिन 6 च्या शूटिंगमध्ये गेल्या काही वर्षांपासून तेजस्वी प्रकाश ही बिझी होती. कारण बिग बाॅसच्या घरात असतानाचा तिला नागिन 6 मिळाले होते. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेती देखील आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे दोघे बिग बाॅसच्या घरात असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले.
विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतर यांनी अनेक गाणे एकसोबत केली. नुकताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे एकसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. करण कुंद्रा याने काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोणावळ्यात धमाल करताना तेजस्वी आणि करण दिसत आहेत.
करण कुंद्रा याने शेअर केलेल्या फोटोमध्ये नाश्त्या करताना करण आणि तेजस्वी दिसत आहेत. टेबलवर अनेक पदार्थ दिसत असून तेजस्वीचे किस करताना करण हा दिसत आहे. आता करण कुंद्रा याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायल होताना दिसत आहे. चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.