मुंबई : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 मध्ये झाली. करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश यांच्या लव्ह स्टोरीला देखील बिग बाॅस 15 मधूनच सुरूवात झालीये. सुरूवातीला अनेकांनी आरोप केले की, बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठीच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे फेक लव्ह करत आहेत. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेती आहे. आता बिग बाॅस (Bigg Boss) पंधराचा फिनाले होऊन एक वर्षांपेक्षाही अधिक कालावधी झाला असून अजूनही करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे सोबत आहेत. अनेकदा हे दोघे फिरताना देखील दिसतात. यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.
तेजस्वी प्रकाश हिच्या वाढदिवसाला करण याने खास गिफ्ट दिले होते. हे दोघे गोव्यात वाढदिवस साजरा करताना दिसले. इतकेच नाही तर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी दुबईमध्ये आलिशान घर देखील खरेदी केले. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे गाणेही काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. चाहते या जोडीवर मोठ्या प्रमाणात प्रेम करतात.
काही दिवसांपूर्वी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. एका पोस्टमुळे ही चर्चा तूफान सुरू आहे.
अखेर करण कुंद्रा याने तेजस्वी प्रकाश हिच्यासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मोठा खुलासा केला आहे. करण कुंद्रा याने एक मुलाखत नुकताच दिलीये. या मुलाखतीमध्ये करण कुंद्रा हा तेजस्वी प्रकाश हिच्यासोबतच्या रिलेशनवर बोलताना दिसला. करण कुंद्रा थेट म्हणाला की, लोक आम्हाला एकसोबत बघू इच्छित नाहीत.
आम्ही दोघे एकमेकांसोबत खुश आहोत. मात्र, सतत आमच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. करण कुंद्रा पुढे म्हणाला की, हे सर्व फेक फॅन करत आहेत. मी एक अभिनेता आहे मी सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, लोक सतत आमच्या ब्रेकअपबद्दल बोलत आहेत. मी जर तेजस्वी प्रकाश हिच्या एखाद्या फोटोवर कमेंट केली नाही किंवा लाईक केले नाही की, लगेचच आमचे ब्रेकअप झाले असे होत नसते. जे लोक आमच्या नात्याबद्दल चुकीचे बोलत आहेत ते माझे चाहते होऊ शकत नाहीत.