बिग बॉसच्या घरात एक कॉफीवरून वाद अगदी टोकाला गेल्याचे पाहायाल मिळाले. हा वाद करणवीर आणि अविनाश यांच्यामध्ये झाला असून कॉफीवरून झाला असून दोघेही एकमेकांना चांगलेच भिडले. या वादामध्ये करणवीरने अविनाशला रागाच्या भरात चक्क धमकी दिल्याचेही पाहायला मिळाले.
कॉफीवरून करणवीर आणि अविनाशमध्ये जोरदार भांडण
कलर्स टीव्हीने एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये करणवीर आणि अविनाश भांडण दिसून येत आहे. करणवीर मेहरा जिम मध्ये व्यायाम करत असतो. यावेळी अविनाश थेट करणवीरकडे बोट दाखवून कॉफी चोरी केल्याबद्दल त्यावर भडकतो. अविनाशच्या या आरोपामुळे करण नाराज होतो आणि म्हणतो मला प्यायचे असेल तर मी समोरून कॉफी घेईन. मला चोरी करायची गरज नाही. चोराच्या घरातल्या चोरीला कोणी चोरी म्हणतात का असं उपहासाने करणवीर म्हणतो. यामुळे दोघांचे वाद आणखी वाढतो.
चोरीच्या आरोपावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं आहे. दुसरीकडे श्रुतिका अर्जुन आता करणवीर आणि इतर सदस्यांपासून दूर झाल्याने दुसऱ्या गटात मतभेद निर्माण झाल्याचं दिसतयं.
“हात उपटून फेकून देईन”…
कॉफी चोरल्यावरून अविनाश मिश्रा करणवीरमध्ये सुरु झालेला वाद हा इतका विकोपाला जातो की अविनाशच्या आरोपांमुळे करणही चिडतो आणि अविनाशला थेट धमकी देतो. “जर कोणी माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावताना दिसला तर त्याचा हात उपटून फेकून देईन” असं म्हणत करणही त्याच्यावर चिडताना पाहायला मिळालं आहे. .
नवा टाईम गॉड निवडला जाणार
सोमवारच्या नव्या एपिसोडची सुरुवातच वादावादीने झाली. आता घरातील सदस्यांमध्ये अजून एक संघर्ष पाहायला मिळणार आहे तो म्हणजे ‘टाईम गॉड’चा. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा नवा ‘टाईम गॉड’ निवडला जाणार आहे.