Kareena Kapoor Khan: अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री आता सुखी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. करीना आणि सैफ यांना दोन मुलं आहे. त्यांचा लहान मुलगा जेह अली खान सध्या तुफान चर्चेत आला आहे. जेहचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्ले स्कूलमध्ये जेहचा पहिला परफॉर्मेंस होता. जेहला स्टेजवर डान्स करताना पाहून करीनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
करीना आणि सैफ यांना नुकताच जेहच्या शाळेच्या कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. तैमूर देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होता. सध्या करीनाच्या कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कार्यक्रमासाठी जेह हत्तीच्या वेशात दिसला.
kareena as a proud mother, saif and tim filming jeh’s school presentation. the family they are. 🥹🤍 pic.twitter.com/gk3IOJc4EF
— letícia (@itsmeletii) December 17, 2024
करीना हिला कायम मुलांसोबत स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर करीनाचे मुलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय करीना देखील तैमूर आणि जेह यांच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
अमृता हिला घटस्फोट दिल्यानंतर काही वर्षात सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे करीनाला हिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता सैफ आणि करीना आनंदी आयुष्य जगत आहे. लग्नानंतर करीना हिने तैमूर आणि जेह यांना जन्म दिला.
गेल्या काही दिवसांपासून करीना तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.