5 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर करीनाने फक्त ‘या’ कारणासाठी सैफशी केलं लग्न; स्वत:च केला खुलासा

| Updated on: Nov 15, 2023 | 1:00 PM

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे लग्नाआधी जवळपास पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र एका कारणासाठी त्यानंतर सैफशी लग्न करण्याचा निर्णय करीनाने घेतला होता. त्या कारणाचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

5 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर करीनाने फक्त या कारणासाठी सैफशी केलं लग्न; स्वत:च केला खुलासा
Kareena Kapoor and Saif Ali Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 15 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला जवळपास दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र लग्नापूर्वी हे दोघं पाच वर्षांपर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने याविषयीचा खुलासा केला. ‘द डर्टी मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत करीनाने सैफशी लग्न करण्यामागील खरं कारणसुद्धा सांगितलं. पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर करीना आणि सैफने लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यामागे एक कारण होतं. हे कारण म्हणजे दोघांनाही बाळ हवं होतं. म्हणूनच सैफशी लग्न करण्याचा करीनाने विचार केला होता.

करीना म्हणाली, “लग्न करण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला मुलंबाळं हवी असतात, खरंय ना? अन्यथा आजच्या काळात मी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहू शकता. सैफ आणि मी जवळपास पाच वर्षांपर्यंत लिव्ह-इनमध्ये राहिलो. पण जेव्हा आम्हाला बाळ हवं होतं, तेव्हा आम्ही एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार केला.” करीना आणि सैफच्या घरात 2016 मध्ये चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. लग्नाच्या चार वर्षांनंतर करीनाने तैमुरला जन्म दिला. त्यानंतर 2021 मध्ये ती दुसऱ्या मुलाची आई झाली. या मुलाखतीत करीना मुलांच्या संगोपनाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली.

हे सुद्धा वाचा

मुलांना वाढवण्याची योग्य किंवा अयोग्य पद्धत असू शकत नाही, असं करीनाचं मत आहे. किंबहुना आपल्या मुलांसमोर आयुष्य भरभरून जगण्यावर तिचा विश्वास आहे, जेणेकरून मुलंसुद्धा हेच शिकतील. तैमुर आणि जेह यांचं संगोपन ती सैफसोबत कशा पद्धतीने करतेय, यावर बोलताना करीना पुढे म्हणाली, “आम्ही त्यांना एका व्यक्तीप्रमाणेच वागणूक देतो, त्यांचा आदर करतो. त्यांना जसं करायचं आहे, तसं करू देतो. त्यातूनच ते शिकतील आणि पुढे जातील. त्यातूनच त्यांना त्यांचा मार्ग सापडत जाईल. परिस्थितीनुसार मुलं स्वत:मध्ये तसे बदल घडवून आणतात. मला माझ्या मुलांसमोर माझं संपूर्ण आयुष्य जगायचं आहे. त्यांच्यासोबत मला सर्वकाही करायचं आहे. आपण खूश राहिलो तर तेसुद्धा खूश राहतील. पण सर्वांत आधी माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी मीच जबाबदार असेन.”