करीना कपूर हिच्यावर करण्यात आला ‘हा’ आरोप, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, हे..

| Updated on: Feb 21, 2024 | 2:57 PM

करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करता आला नाही.

करीना कपूर हिच्यावर करण्यात आला हा आरोप, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, हे..
Follow us on

मुंबई : करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर करीना कपूर ही नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. करीना कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. करीना कपूर हिचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. करीना कपूर आणि आमिर खान हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. मात्र, आमिर आणि करीना कपूरची जादू बघायला मिळाली नाही.

नुकताच करीना कपूर हिने काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे खास फोटोशूट करताना करीना कपूर खान ही दिसलीये. आता करीना कपूरचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, या फोटोनंतर सोशल मीडियावर नेटकरी हे करीना कपूर हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. त्याचे कारणही तेवढे मोठे आहे.

करीना कपूर हिने हे फोटोशूट ग्रीन रंगाच्या गाऊनवर केले. यामध्ये जबरदस्त लूकमध्ये करीना कपूर दिसत आहे. मात्र, असे असताना देखील करीना कपूर खान हिला ट्रोल केले जात आहे. मुळात म्हणजे त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वीच अशा सेम ड्रेसमध्ये अंकिता लोखंडे हिने फोटोशूट केले. दोन्ही फोटो बघता हे स्पष्ट आहे की, अंकिता लोखंडे आणि करीना कपूर खान यांनी घातलेला हा ड्रेस सेमच आहे.

यावरूनच आता थेट करीना कपूर खान हिची खिल्ली उडवली जात आहे. एकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, हैराण करणारे नक्कीच आहे…अंकिता लोखंडे या ड्रेसमध्ये करीना कपूर खान हिच्यापेक्षा अधिक छान दिसत होती. दुसऱ्याने लिहिले की, करीना कपूर खान हिच्या तुलनेत नक्कीच अंकिता लोखंडे या ड्रेसमध्ये छान दिसत होती.

आता सोशल मीडियावर करीना कपूर खानचे हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते हे मोठ्या प्रमाणात या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत.