मुंबई : करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान हिने काही वर्षे बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याला डेट केले. इतकेच नाही तर हे दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, शाहिद आणि करीना कपूर यांचे अचानकपणे ब्रेकअप झाले. शाहिद कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून करीना कपूर हिने सैफ अली खान याला तब्बल पाच वर्षे डेट केले. यानंतर 2012 ला तिने सैफ अली खानसोबत लग्न केले.
2007 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात चक्क करीना कपूर खान हिने शाहिद कपूर याची किस घेतली. पुरस्कार सोहळ्यात करीना कपूर खान हिला बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आनंदाच्या भरात थेट सर्वांसमोरच करीना कपूर खान हिने शाहिद कपूर याच्या गालाची किस घेतली. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.
विशेष म्हणजे करीना कपूर खान हिने किस घेतल्यानंतर शाहिद कपूर हा देखील हैराण झाला. करीना कपूर खान हिच्या या किसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला करीनाच्या आईचा विरोध असल्याचे सांगितले जाते.
करीना कपूर खान त्यावेळी टाॅप अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, त्या तुलनेत शाहिद कपूर तेवढा जास्त सक्सेस अभिनेता नक्कीच नव्हता. यामुळे करीना कपूर खान हिच्या आईचा या लग्नाला चांगलाच विरोध होता. करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले. नेहमीच हे एकसोबत स्पाॅट देखील होत.
करीना कपूर खान हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, करीना कपूर खान हिच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. हा चित्रपट फ्लाॅप गेला. करीना कपूर खान हिच्यासोबत लाल सिंह चढ्डा या चित्रपटात आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान बाॅलिवूडपासून दूर आहे.