अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून करीना बॉलिवूडमध्ये सक्रिय असते. 90 च्या दशकात तर फक्त आणि फक्त बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर करीना हिचा बोलबाला होता. जो आज देखील कायम आहे. चाहत्यांमध्ये करीनाची क्रेझ आजही कायम आहे. करीना फक्त सिनेमांमुळे नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. वयाच्या 44 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अशात वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना कशी स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेते… असा प्रश्न तुम्हाला देखील नक्की पडला असेल.
वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना कपूर चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तर करीनाचं ब्यूटी सिक्रेट काय आहे? जाणून घेण्याची इच्छा तुमची देखील असेल. तुम्ही देखील जाणून थक्क व्हाल की, करीना स्वयंपाक घरातील काही गोष्टींच्या मदतीने चेहऱ्याची काळजी घेते.
आज जाणून घेऊ करीनाच्या उजळत्या आणि चमकत्या चेहऱ्यामागचं रहस्य… करीना स्वतःच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी बदामचं तेल, मध आणि दह्याचा वापर करते… बदामाच्या तेलात अनेक गुणधर्म असतात. बदामाच्या तेलात असलेल्या व्हिटॅमिन-ई मुळे त्वचेचं सौंदर्य वाढतं. करीना कायम बदामच्या तेलाने चेहऱ्याची मसाज करते. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.
मध देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरेल… तुमची त्वचा ड्राय असेल तर, मधाने तुम्ही चेहऱ्याची मसाज करु शकता. नॅचरल फेस पॅकमध्ये मध मिक्स करून चेहऱ्याला लावल्यास दाग कमी होतात आणि तुमची त्वचा मऊ होते…
सुंदर दिसण्यासाठी तुम्ही दही आणि बदामाच्या तेलाचा फेस मास्क वापर करु शकता. दही आणि बदामाचं तेलं मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल… पण चेहऱ्यावर कोणतीही क्रिम किंवा इतर पदार्थ लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सांगायचं झालं तर, करीना कपूर स्वतःच्या सौंदर्याची काळजी तर घेतेच. पण अभिनेत्री योगा आणि वर्कआऊट देखील कायम करते. अभिनेत्री वर्कआऊट करताना सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. शिवाय अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस टीप्स देखील देत असते. करीना कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.