अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आजही करीना बॉलिवूडवर राज्य करत आहे, स्वतःच्या याशाचं पूर्ण श्रेय अभिनेत्री फक्त आणि फक्त मोठी बहीण करिश्मा कपूर हिला देते. एका मुलाखतीत स्वतः करीना हिने आई बबिता कपूर आणि बहीण करिश्मा यांनी सामना केलेल्या परिस्थितीचा खुलासा केला आहे.
करिश्मा कपूर हिचा बॉलिवूडमधील स्ट्रगल पाहून करीना खचली नाही तर, बहिणीच्या प्रवासामुळे करीना आणखी खंबीर झाली. करीना म्हणाली, ‘करिश्मा हिने आयु्ष्यात केलेल्या संकटांचा समाना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यामुळे मी कायम स्वतःला एका पुरुषाप्रमाणे समजते. आज मी जगातील कोणत्याही संकटाचा सामना करू शकते. कितीही संकट येऊदे, कोणीही माझा अपमान करुदे… मी कायम संघर्ष करेल… करिश्मासाठी प्रवास सोपा नव्हाता…’
पुढे करीना म्हणाली, ‘जेव्हा करिश्माने बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाने आणि बाहेरच्या लोकांनी देखील तिचा विरोध केला. मी रात्र – रात्र बहीण आणि आईला रडताना पाहिलं आहे. दोघींना सतत त्रास दिला जात होता. एवढंच नाही तर, करिश्मा इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होईल का? यावर देखील सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते… लहान असताना प्रचंड वाईट परिस्थिती मी पाहिली आहे. खोलीत आई आणि बहिणीला ढसा-ढसा रडताना मी पाहिलं आहे… अनेक दुःखांचा सामना आम्ही केला आहे…’ असं देखील करीना कपूर एका मुलाखतीत म्हणाली होती.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील मुलींच्या यशाचं श्रेय पत्नी बबिता कपूर यांना दिलं. मला माझ्या मुलींवर गर्व आहे. त्यांनी स्वतःच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. यासाठी त्यांची आईच त्यांच्यासाठी प्रेरणा होती. मी दोन्ही मुलींच्या यशाचं श्रेय त्यांच्या आईला देतो. पत्नीनेच दोघींना मार्ग दाखवला. मी कधीच माझ्या मुलींना पाठिंबा दिला नाही…. असं रणधीर कपूर म्हणाले होते.
माझ्या दोन्ही मुलींनी कोणाचं समर्थन नसताना यशाचं शिखर गाठलं, याचा मला गर्व आहे. त्यांनी खूप मेहनत केली आहे.’ असं म्हणत रणधीर कपूर मी चांगला वडील नाही… असं देखील रणधीर कपूर म्हणाले होते. सांगायचं झालं तर, करिश्मा – करीना यांनी जोडी बॉलिवूडच्या बेस्ट बहिणींची जोडी म्हणून ओळखली जाते…
करिश्मा – करीना दोघी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा – करीना त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. सोशल मीडियावर करिश्मा – करीना यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.