अभिनेत्री करीना कपूर खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील करीना काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. करीना कायम पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्रीने फक्त सैफ याच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. करीना कपूर हिने चार फोटो पोस्ट केला आहेत. बेबोच्या चाहत्यांना फोटो आवडले आहेत, तर काहींनी मात्र अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये करीना पती सैफ अली खान याच्यासोबत दिसक आहे. दुसऱ्या फोटोमध्ये एक पिझ्झा आहे. तिसऱ्या फोटोमध्ये सैफ आणि करीना यांची सावली आहे. तर चौथा फोटो फार खास आहे. चौथ्या फोटोमध्ये सैफ याने करीनाचा हात पकडला आहे. करीनाने एक ब्रेसलेट घातलं आहे, ज्यावर ‘बेटर टुगेदर’ असं लिहिलं आहे….
खास फोटो पोस्ट करत करीना हिने कॅप्शनमध्ये, ‘पिझ्झा खाल्ल्यानंतर चालणारं कपल…’ असं लिहिलं आहे. पोस्टवर चाहले लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘याला म्हणतात खरं प्रेम’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भाभी ईद मुबारक तरी म्हणा…’, असं म्हणत अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, ‘या पोस्टच्या मी प्रेमात पडली आहे…’ असं म्हणत चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
सांगायचं झालं तर, करीना कपूर ही सैफ अली खान याची पहिली पत्नी आहे. 2012 मध्ये सैफ आणि करीना यांनी लग्न केलं. त्याआधी दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याने करीना हिच्यासोबत लग्न केलं.
आता अभिनेता दुसऱ्या संसारात आनंदी आहे. अनेकदा सैफ पत्नी करीना आणि दोन मुलांसोबत व्यस्तवेळापत्रकातून वेळ काढत फिरायला देखील जात असतो. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ – करीना यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर अली खान तर लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. तैमूर आणि जेह देखील सेलिब्रिटी किड्स म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत.