मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | ‘हिरोईन’, ‘जब व्ही मेट’, ‘3 इडियट्स’, ‘जाने जान’, ‘रा.वन’, ‘गूड न्यज’, ‘डॉन’ यांसरख्या एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री करीना कपूर हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्री ‘जानेजान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या माध्यमातून करीना हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. सिनेमात अभिनेत्रीचे अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत काही इंटिमेट सीन असल्याची देखील चर्चा रंगली. पण एक काळ असा होता, जेव्हा करीना हिने किसिंग सीनसाठी नकार दिला होता. ‘ओमकारा’ सिनेमानंतर करीना कपूर हिने अभिनेता अजय देवगन याच्यासोबत किसिंग सीनसाठी नकार दिला होता.
स्क्रिप्टच्या गरजेनुसार २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमात अजय सोबत किसिंग सीन द्यायचा होता. पण तेव्हा अभिनेत्री किसिंग सीनसाठी नकार दिला होता. ‘सत्याग्रह’ सिनेमात अजयसोबत ‘किसिंग सीन’ करणं अभिनेत्रीला योग्य वाटत नव्हतं म्हणून तिने नकार दिला.
‘ओमकारा’ सिनेमात इंटिमेट सीन करण्यास अभिनेत्रीचा हरकत नव्हती, पण १६ ऑक्टोबर २०१२ साला अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीनाने किसिंग आणि इंटिमेट सीन करण्यास नकार दिला. लग्नानंतर करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांतं मनोरंजन केलं.
सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानतंर करीना हिने किसिंग सीनसाठी नकार दिला. किसिंग सीनसाठी करीना हिचा नकार असल्यामुळे प्रकाश झा यांना सिनेमात महत्त्वाचे बदल करावे लागले. याआधी अभिनेता इमरान हाशमी याच्यासोबत ‘बदतमीज दिल’ सिनेमात देखीस किसिंग सीन करण्यास नकार दिला होता.
नुकताच करीना हिने वाढदिवस साजरा केला. तेव्हा देखील सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या. सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. लग्नानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म दिला. करीना हिच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर अली खान आहे, तर लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे…
सोशल मीडियावर देखील करीना कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.