नवऱ्याच्या घरात राहाते, अद्यापही…, पती गडगंज श्रीमंत असताना असं का म्हणाली करीना कपूर?

| Updated on: Jul 20, 2024 | 12:37 PM

Kareena Kapoor: कोट्यवधींची मालकीण, कोट्यवधी रुपये घेते मानधन, नवरा गडगंज श्रीमंत... तरी करीना म्हणते, 'नवऱ्याच्या घरात राहाते, अद्यापही...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करीना कपूर हिच्या वक्तव्याची चर्चा...

नवऱ्याच्या घरात राहाते, अद्यापही...,  पती गडगंज श्रीमंत असताना असं का म्हणाली करीना कपूर?
Follow us on

अभिनेत्री करीना कपूर आज बॉलिवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. कपूर कुटुंबाची लेक करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्यामुळे करीना हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यासाठी चाहते कायम इच्छुक असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करीना हिने मोठं वक्तव्य केलं आहे पैशांपेक्षा अधिक मला सिनेमा महत्त्वाचा आहे. शिवाय ‘मी अद्याप माझ्या नवऱ्याच्या घरात राहाते…’ असं वक्तव्य देखील करीना कपूर हिने केलं आहे.

मुलाखतीत करीना कपूर हिला एका सिनेमासाठी 10 – 15 कोटी मावधन घेते… यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला देखील इतके पैसे घ्यायचे आहेत. पण मी पैशांसाठी सिनेमा कधीच करत नाही. जर कोणती भूमिका मला आवडत असेल तर, कमी मानधनामध्ये देखील मी सिनेमा करण्यासाठी तयार होईल…’

‘सिनेमा साईन करणं माझ्या मूडवर आणि सिनेमात माझी भूमिका काय असेल यावर आधारलेलं आहे.’ पुढे विनोदी अंदाजात देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ’10 – 15 कोटी रुपयांचे देखील कमर्शियल सिनेमे असतात. मी आजही स्ट्रगल करत आहे. मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहाते… आपण त्याच्याच  घरात मुलाखत करत आहोत…’ करीना गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

हे सुद्धा वाचा

करीना हिचे काही सिनेमे फ्लॉप गेले पण अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. हीट सिनेमांसोबतच अभिनेत्रीने अनेक फ्लॉप सिनेमे दिले आहेत. 2008 च्या रिपोर्टनुसार, करीना हिने करियरच्या सुरुवातील एका सिनेमासाठी 70 – 90 लाख मानधन घेतलं आहे.

करीना कपूर हिने पहिला सिनेमा ‘रिफ्यूजी’ सिनेमासाठी 50 लाख रुपये मानधन घेतलं होतं. ‘ओमकारा’ सिनेमानंतर करीना हिच्या मानधनात मोठी वाढ झाली. आज अनेक प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिच्यासमोर फेल आहेत. आज करीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना करीना कपूर अभिनेता सैफ अली खान याच्या प्रेमात पडली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, लिव्हइन रिलेशिनशिपमध्ये राहिल्यानंतर सैफ –  करीना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत सैफ – करीना यांनी लग्न केलं.

सैफ अली खान – करीना कपूर

अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत.