मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतल्या एका हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून निधन झालं. त्यांच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर पती बोनी कपूर यांनी बरेच खुलासा केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की श्रीदेवी क्रॅश डाएट फॉलो करायच्या. यामुळे अनेकदा त्यांना चक्करसुद्धा यायची. डॉक्टरांनी त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचाही सांगितलं होतं. या क्रॅश डाएटमुळे श्रीदेवी यांना शूटिंग दरम्यान भोवळ यायची. त्यांच्याआधीही बऱ्याच अभिनेत्रींनी अत्यंत कठोर डाएट फॉलो केला होता. यामध्ये करीना कपूरपासून कतरीना कैफपर्यंत बरीच नाव समाविष्ट आहेत.
करीना कपूर- अभिनेत्री करीना कपूरला ‘टशन’ या चित्रपटात पहिल्यांदा बिकिनी लूकमध्ये पाहिलं गेलं होतं. त्यावेळी तिच्या झिरो साइज फिगरची जोरदार चर्चा झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र करीनाची झिरो साइज फिगर मात्र चांगलीच हिट झाली. यासाठी तिने अत्यंत कठीण डाएट प्लान फॉलो केला होता. या डाएमुळे ती सेटवर बेशुद्धसुद्धा झाली होती.
मिष्टी मुखर्जी- अभिनेत्री मिष्टी मुखर्जीने ‘लाईफ की तो लग गई’ या चित्रपटातून 2012 मध्ये पदार्पण केलं होतं. मिष्टी अत्यंत कठीण डाएट फॉलो करायची आणि तेच तिला महागात पडलं. तेलुगूपासून बंगाली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीचं 2020 मध्ये निधन झालं. किडनी निकामी झाल्याने तिचं निधन झाल्याची माहिती समोर आली होती. मिष्टी अनेकदा कठीण डाएटवर असायची. यामुळेही तिला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
निया शर्मा- ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निया शर्मा तिच्या फिगर आणि लूक्समुळे सतत चर्चेत असते. ‘फूंक ले’ या गाण्यांमध्ये नियाची हॉट फिगर पाहायला मिळाली होती. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, या गाण्याच्या तयारीसाठी फक्त सात दिवस तिच्या हातात होते. म्हणून या सात दिवसात तिने केवळ डाएटच केलं नाही तर खाणंही सोडून दिलं होतं. उपाशी राहून ती वर्कआउट आणि सायकलिंग करायची. तीन तासांपर्यंत ती गाण्याचे रिहर्सल करायची. यामुळे अनेकदा ती बेशुद्ध झाली होती.
कतरिना कैफ- ‘तीस मार खान’ या चित्रपटात कतरिना कैफने ‘शीला की जवानी’ हा आयटम साँग शूट केला होता. हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या गाण्यासाठी कतरिनाने सहा महिने खूप मेहनत घेतली होती. यासाठी ती शूटिंगनंतर रात्रीसुद्धा वर्कआउट करायची. इतकंच नव्हे तर तिने साखर आणि मीठ यांचं सेवन पूर्णपणे बंद केलं होतं. या अत्यंत कठीण डाएटमुळे कतरिनाला त्यावेळी पोटदुखीच्या समस्येचा सामना करावा लागला होता. इतकंच नव्हे तर एका सीक्वेन्सदरम्यान ती बेशुद्ध झाली होती आणि डॉक्टरांना सेटवर बोलवावं लागलं होतं.