kareena kapoor wants to date rahul gandhi: कपूर कुटुंबाची लाडकी लेक करीना कपूरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये सवतःचं स्थान पक्क केलं आहे. आज करीनाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारणारी करीना आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. आता अभिनेता पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगणारी करीना एकेकाळी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायची. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायची.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर करीनासोबत अनेक अभिनेत्यांची नावं जोडण्यात आली. त्यामधील एक म्हणजे अभिनेता शहिद कपूर. दोघे एकमेकांना डेट करत होते. शाहिद आणि करीनाच्या नात्याच्या देखील जोरदार चर्चा रंगल्या. चाहत्यांनी या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलेलं नाही.
दरम्यान, करीनाने केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. एका मुलाखतीत करीनाला कोणाला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा करीनाने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्रीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव घेतलं.
करीना म्हणाली, ‘मला राहुल गांधी यांना डेट करायला आवडेल. कारण मी एका फिल्मी कुटुंबातील आहे, तर राहुल गांधी राजकारणी कुटुंबातील आहेत. म्हणून मला राहुल यांना जाणून घ्यायचं आहे…’ असं उत्तर देत अभिनेत्रीने सर्वांना हैराण केलं.
करीनाच्या या मुलाखतीनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. पण त्यानंतर करीनाच्या आयुष्याच सैफ अली खानची एन्ट्री झाली. करीना आणि सैफ तब्बल पाच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं.
आता करीना तिच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. सैफ आणि करीनाला दोन मुलं आहेत. तैमूर आणि जेह अशी करीनाच्या मुलांची नावे आहेत. करीना कायम तिच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.