Karisma Kapoor | ‘कर्म ठरवतं आपल्या आयुष्यात…’, करिश्मा कपूर हिच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ

| Updated on: Jul 01, 2023 | 12:57 PM

आयुष्यात आलेल्या संकटांना आठवत करिश्मा कपूर हिने स्वतःच्या कर्माला दिला दोष? अभिनेत्रीच्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ... सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा..

Karisma Kapoor | कर्म ठरवतं आपल्या आयुष्यात..., करिश्मा कपूर हिच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Follow us on

मुंबई | अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं नाव बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याही अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्री आईच्या इच्छेनुसार एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं. पण उद्योजकासोबत देखील करिश्माचं नातं टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्री तिच्या दोन मुलांचा सिंगर मदर म्हणून आता सांभाळ करत आहे. पण एका मुलाखतीत अभिनेत्रीने आयुष्यातील कर्मांना दोष देत मोठं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

करिश्मा कपूर आणि तिच्या वादग्रस्त आयुष्याची चर्चा कायम चर्चेत असते. कारण प्रेम, लग्न आणि घटस्फोटामुळे अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चाहत्यांसमोर आलं. सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर हिचं लग्न अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत होणार होतं. एवढंच नाही तर, सर्वांसमोर जया बच्चन यांनी करिश्माचा सून म्हणून देखील उल्लेख केला होता. पण काही अडचणींमुळे करिश्मा आणि अभिषेक यांचं लग्न होवू शकलं नाही.

अभिषेक बच्चन याच्यासोबत नातं तुटल्यानंतर अभिनेत्रीने २००३ मध्ये उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. संजय कपूर याचं करिश्मा हिच्यासोबत दुसरं लग्न होतं. पण संजय कपूर याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर २०१४ मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान करिश्मा हिला मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल प्रश्नविचारण्यात आला. ‘आपल्या आयुष्यात आलेलं प्रेम भयानक आहे, ही गोष्ट कळाल्यानंतर व्यक्ती काय करतो?’ यावर करिश्माने दिलेल्या उत्तरामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

प्रेमाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘आपण कोणावर प्रेम करतो हे फार महत्त्वाचं असतं. पण तुम्हाला योग्य आणि चांगला मुलगा मिळेल की नाही, हे फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर आवलंबून असतं..’ असं अभिनेत्री म्हणाली होती.. करिश्मा कपूर आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

करिश्मा कपूर ९० च्या दशकात अभिनय जगतात अव्वल होती. गोविंदा, शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससोबत देखील तिने स्क्रिन शेअर केली. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जीत’ यांसारख्या सिनेमांमधून करिश्माला स्टारडम मिळाले. आमिर खानसोबतचा ‘राजा हिंदुस्तानी’ आणि शाहरुख खानसोबतचा ‘दिल तो पागल है’ने करिश्माच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.