मुंबई | 31 जुलै 2023 : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने ९० च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. करिश्माला आणि तिच्या अभिनयाला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्री यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. प्रोफेशनल आयुष्यात करिश्मा हिला यश मिळालं पण खासगी आयुष्यात मात्र करिश्मा हिने अनेक संकटांचा सामना केला. आजही करिश्मा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा तुफान रंगत असते. करिश्मा कपूर हिचं नाव बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याही अभिनेत्यासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्री आईच्या इच्छेनुसार एका श्रीमंत उद्योजकासोबत लग्न केलं.
एक वेळ अशी होती जेव्हा करिश्मा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचं लग्न होणार होतं. पण काही कारणांमुळे साखरपुडा झाल्यानंतर करिश्मा आणि अभिषेक यांचं नातं तुटलं. त्यानंतर २००३ मध्ये करिश्मा हिने श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण करिश्मा – संजय यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
लग्नानंतर काही दिवस अभिनेत्रीने वैवाहिक आयुष्याचा आनंद घेतला. पण काही वर्षांनंतर मात्र दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये जेव्हा करिश्मा आणि संजय यांचं नातं न्यायालयात पोहोचलं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला. घटस्फोटादरम्यान दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. ज्यामुळे दोन वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट मान्य झाला.
लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले, तर दुसरीकडे संजयने करिश्माचा लालची म्हणून उल्लेख केला होता. ‘करिश्मा कपूर लालची आहे आणि तिने पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केलं…’ असं संजय कपूर म्हणाला होता. ज्यामुळे सर्वत्र करिश्मा आणि संजय यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.
करिश्मा – संजय यांचं घटस्फोट बॉलिवूडमधील महागडं घटस्फोट ठरला आहे. कारण घटस्फोटानंतर संजय याने करिश्माला एक घर आणि दोन मुलांसाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा करार देखील केला.
करिश्मा कपूर ९० च्या दशकात अभिनय जगतात अव्वल होती. गोविंदा, शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससोबत देखील तिने स्क्रिन शेअर केली. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जीत’ यांसारख्या सिनेमांमधून करिश्माला स्टारडम मिळाले. आमिर खानसोबतचा ‘राजा हिंदुस्तानी’ आणि शाहरुख खानसोबतचा ‘दिल तो पागल है’ने करिश्माच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.