अभिनेत्री करिश्मा कपूर हिने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे करिश्मा कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. करिश्मा कपूर हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. 90 च्या दशकामध्ये ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करिश्मा कपूर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. करिश्मा कपूरच्या आयुष्यात अनेक मोठे चढउतार आले. पती संजय कपूर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करिश्मा कपूर हिच्याकडून करण्यात आले. आता करिश्मा कपूर ही इंडियाज बेस्ट डांन्सर सीजन 4 मध्ये जज आहे. यावेळी ती काही मोठे खुलासे करताना दिसते.
शोमध्ये करिश्मा कपूर हिला मोठा सुखद धक्का देण्यात आला. शोमध्ये करीना कपूर खान हिचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये करीना कपूर ही आपल्या बहिणीबद्दल बोलताना दिसली. करीनाने बहीण करिश्मा कपूर हिच्यासाठी एक व्हिडीओ मेसेज पाठवला. या व्हिडीओवरून हे दिसले की, दोघी बहिणी एकमेकींवर किती जास्त प्रेम करतात.
करीना कपूर म्हणाली की, करिश्मा ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री आहे. ती माझी बहीण आणि आई आहे. त्यापेक्षाही एक मोठी गोष्ट म्हणजे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझ्या नजरेतून करिश्मा हिच्यामुळेच करीना बनू शकली आहे. मी तिला इंडियाज बेस्ट डांन्सरच्या मंचावर पाहून खूप म्हणजे खूप जास्त आनंदी आहे. करीनाचा हा मेसेज पाहून करिश्मा कपूर ही भावूक होताना दिसत आहे.
करिश्मा कपूर म्हणते की, माझ्यासाठी बेबो माझी मुलगी आहे. मी नक्कीच सांगू शकत नाही की, करीनाला सक्सेस झालेले पाहून मी किती जास्त खुश असते. मला माहिती नाही की, मी माझ्या भावना कशा व्यक्त करू.पण मला तिच्यासाठी आईची एक फिलिंग येते. यावेळी करिश्मा कपूर ही आपल्या डोळ्यातील अश्रू लपवताना दिसत आहे.
दोघी बहिणीमधील प्रेम या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. करिश्मा कपूर ही काही दिवसांपूर्वीच करीना कपूर हिच्या घरी जाताना दिसली होती. हेच नाही तर तैमुरसोबतचा तिचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसला. करीना कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसला.