सलमान, शाहरूखसाठी करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं केलं बंद; कारण ऐकून आश्चर्य वाटेल !

| Updated on: Dec 21, 2024 | 6:35 PM

करिश्मा कपूरने गोविंदासोबत अनेक हिट चित्रपट देऊनही सलमान, शाहरूखसाठी तिने अचानक गोविंदासोबत चित्रपट न करण्याचा घेतला होता निर्णय.कारण ऐकून आश्चर्य वाटेल. 

सलमान, शाहरूखसाठी करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं केलं बंद; कारण ऐकून आश्चर्य वाटेल !
Follow us on

करिश्मा कपूर सध्या जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसली तरी तिचे 90 च्या दशकातील चित्रपट आणि गाणी आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. त्यात करिश्मा आणि गोविंदाची बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 90 चा काळ या दोघांनी जितका गाजवला त्याला तोड नाही. या दोघांनी जेवढे सिनेमे केले तेवढे सर्व सिनेमे हिट झाले.

करिश्मा आणि गोविंदाच्या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले

या जोडीने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. प्रत्येक चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. यांच्या जोडीसाठी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडायच्या. या जोडीने ऐकापेक्षा एक चित्रपट दिल्यानंतर ही जोडी पुन्हा चित्रपटात एकत्र दिसेनाशी झाली. अचानक त्यांनी एकत्र काम करणे बंद केले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. पण हा निर्णय करिश्मा कपूरकडूनच घेण्यात आला होता.

करिश्मा आणि गोविंदाची जोडी 1993 ते 1999 पर्यंत हिट जोडी होती. 6 वर्षात त्यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. गोविंदासोबत केलेल्या चित्रपटांनी करिश्माच्या करिअरला नवी ओळख मिळाली होती. मात्र दोघांनी 2000पासून त्यांनी एकत्र काम करणे बंद केल्याचं म्हटलं जातं. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. असं या दोघांमध्ये काय झालं असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते.

करिश्माने का घेतला निर्णय?

गोविंदासोबतचा प्रत्येक चित्रपट हिट होत असतानाही करिश्माने गोविंदासोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला कारण तिला मसाला चित्रपटांपासून दूर जायचं होतं असं तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. गोविंदासोडून तिला आमिर, सलमान आणि शाहरुख खानसोबच काम करण्याची इच्छा होती . त्यामुळेच तिने गोविंदासोबत काम करणे बंद केले. याबद्दल तिने स्वत:च एका मुलाखती दरम्यान खुलासा केला.

करिअरच्या सुरुवातीला करिश्माला खूप संघर्ष करावा लागला

करिश्माचा 1996 मध्ये आमिरसोबत आलेला ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमा सुपरहिट ठरला. यातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहे. या चित्रपटात करिश्माला आमिर खानसोबत कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि करिश्मा इंडस्ट्रीतील ए-लिस्टर अभिनेत्रींपैकी एक बनली होती. यानंतर करिश्माला अनेक हाय प्रोफाईल प्रोजेक्ट्स मिळू लागले. करिश्माने सलमान खानसोबत ‘जुडवा’ मध्ये काम केले. यानंतर शाहरुख खानसोबत ‘दिल तो पागल है’ सिनेमा केला.

काही अवधीतच करिश्मा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली अन् या सर्वात करिश्मा-गोविंदाची जोडी मागे पडत गेली. दरम्यान कपूर घराण्यातील असूनही करिअरच्या सुरुवातीला करिश्माला खूप संघर्ष करावा लागल्याचं तिने म्हटलं होतं.