Karisma Kapoor Alimony: एक काळ असा होता जेव्हा करिश्मा कपूर हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. करिश्मा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. करिश्मा ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्मा कपूर प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली. पण अभिनेत्रीला खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करावा लागला…
करिश्मा कपूर हिने 2003 मध्ये उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 13 वर्षानंतर करिश्मा – संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटा दरम्यान करिश्माने पतीवर अनेक गंभीर आरोप केले…
करिश्मा कपूरने पती संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबियांवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, संजयने देखील कोर्टात करिश्मावर अनेक आरोप केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजयच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होतं की, करिश्माने केवळ पैशांसाठी लग्न केलं आणि ती लालची बाई आहे… अशी वकिलांनी संजयच्या वतीने बाजू मांडली होती.
करिश्मा कपूरला मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन मुले आहेत. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर दोन्ही मुले आईसोबत राहतात. मात्र, दोन्ही मुलांचा खर्च वडील संजय कपूरच्या खांद्यावर आहे. संजय अनेकदा मुलांना भेटण्यासाठी देखील येत असतो.
घटस्फोटानंतर संजय कपूरने करिश्मा आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. याशिवाय करिश्मा कपूरला संजयच्या वडिलांचे घरही देण्यात आलं. एवढंच नाही तर, आजपर्यंत संजय कपूर प्रत्येक महिन्याला करिश्माला 10 लाख रुपये देतो… संजय मुलांच्या शिक्षणाचा देखील खर्च देतो…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर सोना BLW प्रेसिजनचा चेअरमन आहे. संजय कपूर याच्याकडे जवळपास 120 कोटींची संपत्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर वर्षभरातच संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत हिच्यासोबत तिसरं लग्न केलं.