करिश्मा कपूरचे 4 हँडसम एक्स-बॉयफ्रेंड, ज्यांच्यावर आजही तरुणी फिदा, तिसऱ्या पुरुषाबद्दल जाणून व्हाल थक्क

| Updated on: Jun 26, 2024 | 2:35 PM

Karisma Kapoors 4 Ex-Boyfriend : करिश्मा कपूर हिचे 4 हँडसम एक्स-बॉयफ्रेंड, ज्यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ, अनेक तरुणी त्यांच्यावर फिदा तिसऱ्या पुरुषाबद्दल जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र करिश्मा हिच्या एक्स - बॉयफ्रेंड्सची चर्चा...

करिश्मा कपूरचे 4 हँडसम एक्स-बॉयफ्रेंड, ज्यांच्यावर आजही तरुणी फिदा, तिसऱ्या पुरुषाबद्दल जाणून व्हाल थक्क
Follow us on

अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटींची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत करिश्मा हिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने आई बबिता यांच्या इच्छेनुसार उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं फार काळ टिकलं नाही. अखेर दोन मुलांच्या जन्मानंतर करिश्मा आणि संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याचा विषय निघाल्यानंतर तिच्या एक्स – बॉयफ्रेंड्सची देखील चर्चा रंगते. करिश्मा कपूर हिचे सर्व एक्स – बॉयफ्रेंड्स आचा पन्नाशीच्या पुढे आहेत. तरी देखील त्यांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये आहे. त्यांच्यावर आजही अनेक तरुणी फिदा आहे.

मीडियारिपोर्टनुसार, करिश्मा कपूर आणि अभिनेता अजय देवगन याच्या रिलेशनशिपबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अजय देवगन याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत संसार थाटला. आज अजय 55 वर्षांचा आहे. तरी देखील प्रचंड हँडसम दिसतो.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिनेच्या एक्स – बॉयफ्रेंड्सच्या यादीत अभिनेता सलमान खान देखील आहे. सलमान खान आज 58 वर्षांचा आहे. पण चाहत्यांमध्ये अभिनेत्याची असलेली क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. आजही चाहते सलमान खान याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिनेता गोविंदा आणि करिश्मा यांच्या देखील रिलेशनशिपने सर्वत्र जोर धरला होता. फक्त रिल लाईफमध्येच नाहीतर, रियल लाईफमध्ये देखील गोविंदा – करिश्मा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आज गोविंदा 60 वर्षांचे आहेत. पण तरी देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये होत असते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काही कारणांमुळे दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिषेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं.