“बापरे ही खरच मंजुलिका”; विद्या बालनने उलटा पाय दाखवताच माधुरी घाबरली, तर कार्तिक आर्यन म्हणाला “चुडैल”

| Updated on: Oct 27, 2024 | 4:41 PM

भूल भुलैया 3 च्या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये विद्या बालन स्टेजवर पडताना दिसत आहेत आणि कार्तिक आर्यन त्यांना "चुडैल" म्हणताना दिसतात. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून विनोदपूर्ण प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

बापरे ही खरच मंजुलिका; विद्या बालनने उलटा पाय दाखवताच माधुरी घाबरली, तर कार्तिक आर्यन म्हणाला चुडैल
Kartik Aaryan Calls Vidya Balan "Chudail" During Bhool Bhulaiyaa 3 Promotion
Follow us on

बहूप्रतिक्षित चित्रपट ‘भूल भुलैया 3’ प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. त्याच चित्रपटातील सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे ‘आमी जे तोमार’ या गण्याचे नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यां दोघींनी अप्रतिम नृत्य केल्याचे दिसून आले. या गाण्याच्या रिलीजच्या खास प्रसंगी विद्या बालन व माधुरी दीक्षित यांनी या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मही केलं. मात्र या स्टेजवर गाण्यावर परफॉर्म करतावा विद्या बालन साडीत पाय अडकून खाली पडल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. मात्रा आता त्याच कार्यक्रमादरम्यानचा विद्या बालन आणा कार्तिक आर्यनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सर्वांसमोर कार्तिक विद्याला म्हाणला ” ये देखो चुडैल”

अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘भूल भुलैया’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंत ‘भूल भुलैया’ 2 आला ज्यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसला.तर तब्बूही वेगळ्या भूमिकेत दिसून आली. या दोघांच्याही भूमिकेचं चाहत्यांकडून कौतुकच झालं. आता ‘भूल भुलैया 3’ या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे.

या चित्रपटातील बहुचर्चित आणि खूप गाजलेलं गाणं म्हणजे ‘आमी जे तोमार’ हे रॉयल ऑपेरा हाऊस, मुंबई येथे या गाण्याच्या नवीन व्हर्जनच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. अशातच प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. विद्या बालने ने कार्तिक आर्यनला तिचे पाय दाखवताच भर स्टेजवरच तो विद्याला ‘चुडैल’ म्हणाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

‘भूल भुलैया 3’ ची टीम सिनेमाच्या प्रमोशन करत होते. यावेळी स्टेजवर सगळे प्रश्न उत्तरांचं सेशन सुरु होते. तेवढ्यात विद्या बालनने कार्तिक आर्यनला तिचा एक पाय सरळ आणि एक पाय उलटा करून ती गमंत दाखवली. हे पाहून कार्तिक चकित झाला. तेवढ्यात माधुरीचेही त्या दोघांकडे लक्ष गेल्यावर तिने काय झालं विचारताच विद्याने पुन्हा आपला एक पाय उलटा करून तिला दाखवला. हे पाहून घाबरली. यावेळी कार्तिक मोठ्याने म्हणाला “ये देखो चुडैल, पैर उलटे है”. कार्तिक ने असं म्हणताच सगळेच हसायला लागले.

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट

कार्तिक, विद्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिबापरे डोवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. त्याचसोबत विद्याचे पाय पाहातच माधुरीने म्हटलेल्या ‘बापरे’वर देखील नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे ” विद्या बालन खरोखरच मंजुलिका आहे” , तर एका युजरने म्हटले आहे माधुरीने म्हटलेले ‘बापरे’ हे आयकॉनिक होते”, तर एकाने म्हटलं आहे “विद्या आणि कार्तिक आर्यन हे लास्ट बेंचर बेस्ट फ्रेंड सारखे वागत आहेत” अशा पद्धतीने मजेशीर कमेंट करत नेटकऱ्यांनी यांच्या व्हिडीओ प्रचंड पसंती दिली आहे.

Kartik Aaryan Calls Vidya Balan “Chudail”

चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित
दरम्यान, ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ‘भूल भुलैया3’ ची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. तिसऱ्या भागात प्रेक्षकांना काय नवं पाहायला मिळणार आहे याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष आहे.