अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. कार्तिकचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. आता त्याच्या डेटिंग लाइफविषयी मोठी हिंट कार्तिकच्या आईनेच दिली आहे. कार्तिक त्याच्यापेक्षा वयाने 11 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याची हिंट आईने दिली आहे. या अभिनेत्रीची सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा आहे. याबाबत कार्तिकची आई माला तिवारी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच आयफा पुरस्कार सोहळा जयपूरमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन कार्तिकने केलं होतं. यावेळी प्रेक्षकांमध्ये त्याची आई माला तिवारीसुद्धा बसल्या होत्या. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये कार्तिकच्या आईला त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर त्यांनी मुलाच्या डेटिंग लाइफबद्दल मोठी हिंट दिली आहे. “कुटुंबाची डिमांड ही एक चांगल्या डॉक्टरची आहे”, असं कार्तिकची आई म्हणते. यावरूनच त्याच्या गर्लफ्रेंडची हिंट मिळाल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
कार्तिकची आई जिच्याविषयी बोलत आहेत, ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्रीलीला आहे. कारण श्रीलीला ही अभिनयासोबतच डॉक्टर बनण्याचंही शिक्षण घेत आहे. याविषयी अद्याप कार्तिक किंवा श्रीलीलाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी कार्तिकच्या कुटुंबीयांच्या सेलिब्रेशनमध्येही श्रीलीला सहभागी झाली होती. या सेलिब्रेशनचं आयोजन कार्तिकची बहीण आणि डॉक्टर कृतिका तिवारीने केलं होतं. या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यातत श्रीलीला कार्तिकच्या कुटुंबीयांसोबत मजामस्ती करताना दिसली होती.
विशेष म्हणजे कार्तिक आणि श्रीलीला लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. श्रीलीला ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री असून ‘पुष्पा 2’मधील आयटम साँगमध्येही ती झळकली होती. ती केवळ 23 वर्षांची असून आतापर्यंत तिने प्रसिद्ध दाक्षिणात्य कलाकारांसोबत काम केलंय. श्रीलीलाने आतापर्यंत तीन साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स जिंकले आहेत.