Kartik Aaryan On Satish Kaushik : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी कौशिक यांनी अखरेचा श्वास घेतला. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. अभिनेता कार्तिक आर्यन याने देखील सतीश कौशिक यांच्या निधनानंतर ते घरमालक म्हणून कसे होते.. याबद्दल सांगितलं.
कार्तिक जेव्हा बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत होता. तेव्हा अभिनेता सतीश कौशिक यांच्या घरात राहत होता. अखेर कार्तिक याने सतीश कौशिक यांच्या निधननंतर ते घरमालक म्हणून कसे होते? हे सांगितलं आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये कौशिक यांच्या निधनावर दुःख देखील व्यक्त केलं आहे.
सतीश कौशिक यांच्याबद्दल कार्तिक म्हणाला, ‘एक उत्तम अभिनेते… उत्तम व्यक्तिमत्व… मुंबईमध्ये आल्यानंतर जेव्हा कठीण परिस्थितीत होतो तेव्हा घरमालक म्हणून त्यांनी साथ दिली. तुम्ही दिलेली प्रेरणा आणि आनंद कायम लक्षात राहिल…. आरआयपी सतीश सर…’ सध्या कार्तिकची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कंगना रनौत हिने देखील त्यांच्या चिअरलिडर म्हणून उल्लेख केला. ‘या भयानक बातमीसह माझी सकाळ झाली आहे. ते माझे सर्वात मोठे चीयरलीडर होते. एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक खऱ्या आयुष्यात मात्र दयाळू आणि उत्तम व्यक्ती होते. त्यांना इमरजेंसी सिनेमात दिग्दर्शक करणं मला आवडलं होतं. त्यांची कायम आठवण येईल ओम शांती…’ असं कंगना म्हणाली.
सतीश कौशिक यांनी 1993 मध्ये रूप की रानी चोरों का राजा’ या सिनेमातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’ यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. शिवाय कंगना रनौत हिच्या ‘इमरजेन्सी’ सिनेमाचं दिग्दर्शन देखील कौशिक यांनी केलं आहे. सिनेमा कौशिक यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणार आहे. शिवाय ‘गन्स एन्ड गुलाब’ सतीश कौशिक यांचा शेवटचा वेब शो ठरणार आहे.