चंदू चॅम्पियन चित्रपटाचे ज्यावेळी कार्तिकने शूटिंग केले त्यावेळी त्याला खूप ताप होता. मात्र, शेड्युल असल्याने त्याने ते पूर्ण केले. कारण ज्या ठिकाणी चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग होते, त्याची परत तारीख मिळणार नव्हती.
गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच कार्तिकचे चित्रपट धमाका करत आहेत.