अभिनेता कृष्णा अभिषेक हा चांगलाच चर्चेत आहे. सध्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह हे लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लाफ्टर शेफलाही प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळताना बघायला मिळतंय. अनेक मोठे कलाकार या लाफ्टर शेफमध्ये सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच शोमध्ये स्पर्धेकांना मदत करण्यासाठी काही कलाकार गेस्ट म्हणून दाखल झाले होते. मात्र, यावेळी बिग बॉस फेम अर्चना गाैतम हिने असे काही केले की, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय. आता यावरच बोलताना कश्मीरा शाह दिसलीये.
कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांना मदत करण्यासाठी शोमध्ये अर्चना गाैतम ही त्यांच्या टिमकडून दाखल झाली. नुकताच कश्मीरा शाह हिने एक मुलाखत दिली. कश्मीरा शाह ही म्हणाली की, अर्चना गाैतम ही आपल्या मर्यादा शोमध्ये ओलांडताना दिसली. जे मला अजिबातच आवडले नाही. तिने कृष्णा अभिषेकला जे काही बोलले ते चुकीचेच होते.
कश्मीरा म्हणाली, अर्चना ही कृष्णासोबत जास्तच क्लोज होत होती, जे चांगले नव्हते. बिग बॉस ओटीटी 3 चे उदाहरण देत कश्मीरा हिने म्हटले की, अरमान मलिक हा आपल्या पत्नीबद्दल कसा पजेसिव्ह आहे, त्याने विशाल पांडे याला कानाखाली मारली. मी देखील तशीच पजेसिव्ह माझ्या पती आणि मुलांबद्दल आहे.
अर्चनाने मजाकमध्ये माझ्या पतीला म्हटले की, मला मागून गळाभेट दे. मी त्याचवेळी अर्चना गाैतम हिला मर्यादेत राहण्यास सांगितले आणि तिला म्हटले की, मी तुझ्या कानाखाली देईल. कश्मीरा पुढे म्हणाली, मी सर्वकाही सहन करू शकते पण या गोष्टी मला खरोखरच अजिबातच आवडत नाहीत. माझ्या पतीला मागून गळाभेट घे ती माझ्यासमोर म्हणत होती.
यामुळेच मी अरमान मलिक याला पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हणून शकत नाही. थोडक्यात काय तर कश्मीरा शाह हिला अर्चना गाैतम हिचे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. अर्चना गाैतम ही बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसली. मात्र, त्यावेळी अर्चना गाैतरम हिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.