World Cup 2023 : क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. चांगल्या – वाईट परिस्थितीत दोघे देखील कधीही एकमेकांची साथ सोडत नाहीत. वर्ल्ड कप दरम्यान, प्रत्येक सामन्यात अनुष्का विराटसाठी स्टेडियमवर उपस्थित होती. वर्ल्ड कप 2023 मध्ये 10 सामने जिंकल्यानंतर फायनलमध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर प्रत्येक जण निराश आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रिटी देखील भावना व्यक्त करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यानंतर सर्वत्र फायनलची चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर विराट आणि अनुष्का यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. फायनल सामन्यातील पराभवानंतर उदास विराट कोहली याचे आश्रू पुसण्यासाठी अनुष्का पतीसोबत होती. दोघांच्या नात्याबद्दल अभिनेत्री कतरिना कैफ हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि कतरिना कैफ हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री कतरिना कैफ म्हणाली, ‘विराट – अनुष्का कायम एकमेकांसोबत असतात. परिस्थिती कोणतीही असली तरी दोघे एकमेकांसाठी खंबीरपणे उभे असतात. जेव्हा विराट खेळतो तेव्हा अनुष्का हिच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. दोघांचं नात फार खास आहे..’
पुढे कतरिना विराट कोहली याच्या फिटनेसबद्दल देखील म्हणाली, ‘विराट याचं फिटनेस उत्तम आहे. त्याने स्वतःला फिट ठेवलं आहे. आपण विराट याची मेहनत आणि शिस्त पाहू शकतो.’ सध्या सर्वत्र फक्त आणि कतरिना कैफ हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर, अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि कतरिना कैफ शेजारी आहेत. अनु्ष्का – विराट यांच्यासोबत कतरिना हिचे चांगले संबंध आहेत. कतरिना कैफ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘टायगर 3’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान याच्यासोबत कतरिना हिच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे.
कतरिना कैफ – विकी कौशल यांनी 2019 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.