Katrina Kaif | कतरिना कैफ हिने विकी काैशल याच्यासाठी शेअर केली खास पोस्ट, अभिनेता थेट म्हणाला तू

| Updated on: Jun 03, 2023 | 3:35 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ हिने एक खास फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकताच विकी काैशल आणि सारा अली खान यांच्या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे धमाकेदार ओपनिंग या चित्रपटाने केलीये.

Katrina Kaif | कतरिना कैफ हिने विकी काैशल याच्यासाठी शेअर केली खास पोस्ट, अभिनेता थेट म्हणाला तू
Follow us on

मुंबई : विकी काैशल आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. विकी काैशल आणि कतरिना यांनी 9 डिसेंबर 2021 मध्ये राजस्थान येथे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले. फिल्म इंडस्ट्रीमधील काही लोकांना या लग्नाचे निमंत्रण देखील देण्यात आले. अत्यंत खासगी पध्दतीने विकी काैशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अगोदर बरीच वर्षे एकमेकांना डेट करताना विकी काैशल आणि कतरिना कैफ हे दिसले होते. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या अगोदर यांच्या अफेअरच्या (Affair) बातम्या या सतत सुरू होत्या. मात्र, यांनी कधी यांचे रिलेशन मान्य केले नव्हते.

गेल्या काही दिवसांपासून देशभर विकी काैशल आणि सारा अली खान हे त्यांच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. राजस्थानमध्येही काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सारा आणि विकी हे पोहचले होते. थेट जयपुरमध्ये सारा अली खान ही विकी काैशल यांच्यासोबत खरेदी करताना दिसली.

राखी सावंत हिच्यासोबतचा देखील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. विशेष म्हणजे डान्सच्या शेवटी चक्क राखी सावंत ही सारा अली खान हिला उचलून घेताना देखील दिसली होती.

 

सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या चित्रपटाची ओपनिंगही जबरदस्त ठरलीये. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 5.49 कोटींचे कमाई केलीये. विकेंडला देखील चित्रपट धमाका करेल असे सांगितले जात आहे. पतीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना कैफ ही दिसली आहे. नुकताच कतरिना हिने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

कतरिना कैफ हिने जरा हटके जरा बचके हा चित्रपट बघण्यासाठी सर्वांना विनंती केली असून कतरिना कैफ हिने इंस्टा स्टोरीवर फोटो देखील शेअर केला आहे. कतरिना कैफ म्हणाली की, हा चित्रपट अत्यंत प्रेमाने तयार करण्यात आलाय. आता कतरिना कैफ हिची ही पोस्ट रिशेअर करत विकी काैशल याने लिहिले की, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए…