Katrina kaif sugar : अभिनेत्री म्हटलं की अभिनयासोबतच लक्ष द्यावं लागतं ते डाएटकडे. त्यात बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे तर आपल्या डाएटकडे खास लक्ष असते. त्यांपैकीच एक अभिनेत्री आहे जी आपले डाएट अगदी काटेकोरपणे पाळते. ती म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिना तिच्या खाण्यावर विशेष लक्ष देत असते. ती शक्य तितकं कमी गोड खाण्याचा प्रयत्न करते. हे बऱ्याच कार्यक्रमांमधून समोर आलं आहे. तसेच तिचे वर्कआऊटचे आणि जिमचे फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होतं आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांनी तिच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कतरिना कैफ सोशल मीडियावर सक्रिय असते. कतरिनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिच्या फॅनपेजवरून देखील शेअर करण्यात येतात. अशाच एका चाहत्याच्या सोशल मीडियावरून कतरिनाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका कार्यक्रमादरम्यानचा तिचा एक व्हिडीओ असून व्हायरल झाला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. कतरिना त्या कार्यक्रमात भारतीय पारंपारिक वेषात दिसली. तिच्या लूक किंवा साडीपेक्षा जास्त चर्चा झाली ती तिच्या हातावर असलेल्या एक काळ्या पॅचची. हा व्हिडीओ त्यामुळे खूप व्हायरलही झाला.
काळ्या पॅचने लक्ष वेधलं
व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे कतरिनानं फिकट नारंगी रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या लूकची नेटकऱ्यांनी कौतुकही केलं. याचवेळी अनेक लोकांचे लक्ष हे तिच्या हातावर असलेल्या एका काळ्या रंगाच्या पॅचनं वेधलं आहे. हा काळ्या रंगाचा पॅच म्हणजे शुगर ट्रॅक पॅचसारखा दिसत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या पॅचचा वापर हा ब्लड शुगर लेव्हल मॉनिटर करण्यासाठी करतात. या पॅचला ग्लूकोज मॉनिटर म्हणून ओळखतात. हा पॅच डायबिटीजची समस्या असलेले लोक घालतात. या डिव्हाइसमुळे बोटावर सुईनं टोचायची गरज भासत नाही आणि तरीही शुगर ट्रॅक करण्यास मदत होते.
चाहत्यांना कतरिनाची काळजी
कतरिनाच्या दंडाला लागलेला हा पॅच पाहून अनेकांनी तिच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. कतरिनाच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ती ठीक आहे ना?’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा तर मेडिकल पॅचसारखा दिसतोय.’ तर एकाने काळजी व्यक्त करत प्रश्न विचारला की, ‘कतरिना डायबिटीक आहे का?’
एका रिपोर्टनुसार, कतरिना कैफच्या दंडावर असलेला हा काळा पॅच डायबिटीज पॅच असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, अजून यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही की कतरिनाला खरंच डायबिटीज आहे. पण काही नेटकऱ्यांनी कतरिनाच्या या पॅचचा संबंध इतर गोष्टींशी जोडला आहे.
एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, ‘हा अल्ट्राह्युमन सारखं काही फिटनेस ट्रॅकरही असू शकतो. जी ब्लड शुगर, हृदयाची श्वास घेण्याची गती आणि इतकंच नाही तर झोपेचा पॅटर्नला देखील मॉनिटर करतं.’ तर, अजून एकाने कमेंट करत म्हटलं ‘डायबिटीज पॅच सर्वसाधारणपणे टाइप-1 डायबिटीज आणि टाइप-2 डायबिटीज असलेली व्यक्ती शुगर लेव्हलला सतत मॉनिटर करण्यासाठी घालते.’
त्यामुळे या सगळ्या कमेंटवरून कतरिनाने घातलेला हा काळा पॅच डायबिटीज पॅच असण्याची शक्यता आहे. मात्र त्यावर शिक्कामोर्तब करणे चुकीचे आहे. चाहत्यांनी सांगितलेला अंदाज कितपत खरा आहे हे मात्र नक्की सांगता येणार नाही. तरीही चाहत्यांनी कतरिनाला तिच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती केली आहे.