अभिनेते मनोज बाजपेयी आणि अभिनेत्री कतरिना कैफ दोघांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये दोघांनी देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनोज आणि कतरिना यांनी 4 जून 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजनीती’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी होते. सांगायचं झालं तर, राजनीती सिनेमा 2010 मधील हीट सिनेमा ठरला होता. सिनेमात कतरिना, मनोज यांच्यासोबत अजय देवगन, नाना पाटेकर आणि रणबीर कपूर यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती.
सिनेमात एकापेक्षा एक सेलिब्रिटी होते. अशात कतरिना हिचा अनुभव इतरांच्या बाबातीत कमी होता. असं असताना देखील अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण जेव्हा सिनेमाचं प्रिमियर पार पाडला, तेव्हा कतरिना हिने सर्वांसमोर मनोज बाजपेयी यांचे पाय धरुन नमस्कार केला. सिनेमातील ‘करारा जवाब मिलेगा’ हा मनोज बाजपेयी यांचा डायलॉग आजही लोकप्रिय आहे.
14 वर्षांपूर्वी जेव्हा स्टार कास्टसाठी सिनेमाचं प्रिमियर ठेवण्यात आलं होतं. तेव्हा सिनेमा पाहाण्यासाठी सेलिब्रिटींची गर्दी जमली होती. सिनेमा पाहिल्यानंतर मनोज बाजपेयी यांच्या अभिनयावर फिदा झालेल्या कतरिना हिने सर्वांसमोर त्यांचे पाय धरले. पण तेव्हा मनोज बाजपेयी यांना संकोचल्यासारखं झालं.
एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी याबद्दल खुलासा देखील केला होता. ‘कतरिना हिने सर्वांसमोर माझे पाय धरुन नमस्कार केला. सिनेमात पाहिल्यानंतर तिने मझ्या अभिनयाला दिलेला तो सन्मान होता. पण मला तेव्हा वृद्ध झाल्यासारखं वाटलं होतं…’ एवढंच नाहीतर, मनोज बाजपेयी अभिनेत्रीचं कौतुक देखील केलं.
मनोज बाजपेयी यांच्याप्रमाणे कतरिना हिने देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. कतरिना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. ‘राजनीती’ सिनेमात रणबीर – कतरिना यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं
तेव्हा दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. अनेक वर्ष कतरिना – रणबीर यांनी एकमेकांना डेट देखील केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. पण आज दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. कतरिना हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्री कायम पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर स्पॉट करत असते.