कतरिना कैफ होती मृत्यूच्या दारात, अभिनेत्री म्हणाली, ‘माझा अंत मला दिसत होता, पण…’

| Updated on: Nov 26, 2023 | 10:01 AM

Katrina Kaif : 'माझा अंत मला दिसत होता...', कतरिना कैफ हिचा काळ जवळ आला होता, 'ती' धक्कादायक घटना घडली असती आज चाहत्यांमध्ये नसती कतरिना कैफ! अनेक वर्षांनंतर कतरिना कैफ हिने सांगितली तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना...

कतरिना कैफ होती मृत्यूच्या दारात, अभिनेत्री म्हणाली, माझा अंत मला दिसत होता, पण...
Follow us on

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री कतरिना कैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कतरिना ‘टायगर 3’ सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. सिनेमात चाहत्यांनी सलमान – कतरिना यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. सिनेमात सलमान याच्या कुटुंबावर मृत्यूचं सावट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण कतरिना हिच्या खऱ्या आयुष्यात मात्र काळ आला होता. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कतरिना कैफ हिची चर्चा रंगली आहे.

धक्कादायक घटनेचा खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, ‘एकदा हेलीकॉफ्टर मधून प्रवास करत होती. तेव्हा हेलीकॉफ्टरमध्ये काही अडचणी होत्या. हेलीकॉफ्टर खाली पडत असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. तेव्हा मला माझ्या आयुष्याचा अंत दिसत होता. पण तेव्हा देखील मला एकच विचार सतावत होता आणि तो म्हणजे माझी आई ठिक तर राहिल ना?’ तेव्हा कतरिना हिचा काळ आला होता. पण अभिनेत्रीच्या नशीबात काही खास होतं..

कतरिना कैफ आज बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध, लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेत्रींमध्ये कतरिना कैफ हिची गणना होते. कतरिना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम आई, भावंड आणि सासरच्या मंडळींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

हे सुद्धा वाचा

कतरिना कैफ हिच्या वडिलांनी अभिनेत्री लहाना असताना पत्नीची साथ सोडली. कतरिना हिच्या आईने ‘सिंगल मदर’ म्हणून कतरिना आणि तिच्या भावंडांचा सांभाळ केला. कतरिना हिची आई एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सोशल मीडियावर कतरिना हिचे आईसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

कतरिना कैफ आणि विकी कौशल

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2O21 मध्ये कतरिना – विकी यांनी शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना देखील प्रचंड आवडले.. आता देखील विकी – कतरिना कायम एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.