कतरिनाच्या केसांच्या सौंदर्याचं रहस्य आहे सासूबाई; सुनेसाठी बनवतात स्पेशल हेअर ऑईल

| Updated on: Dec 22, 2024 | 5:31 PM

सासूबाई आपले खाण्याच्या बाबतीत तेसच इतर गोष्टींमध्येही किती लाड करतात याबद्दल कित्येक मुलाखतींमध्ये अभिनेत्री कतरिना कैफनं सांगितलं आहे. तसेच त्या कतरिनाच्या केसांची विशेष काळजी घेतात. त्या तिच्यासाठी घरीच एक खास तेलही बनवतात असं कतरिनाने सांगितले आहे.

कतरिनाच्या केसांच्या सौंदर्याचं रहस्य आहे सासूबाई; सुनेसाठी बनवतात स्पेशल हेअर ऑईल
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाच चर्चेत असलेली जोडी आहे. तसेच चाहत्यांनासुद्धा या दोघांची जोडी प्रचंड आवडते. कतरिना किंवा विकीबद्दलचे छोट्यातले छोटे अपडेटही त्यांचे फॅन्स फॉलो करत असतात.

कतरिनाची आणि तिच्या सासूबाईंची जोडी फेमस 

कतरिना कैफ आणि विकी कौशलप्रमाणेच, कतरिनाची आणि तिच्या सासूबाईंची जोडीही तितकीच फेमस आहे. कौशलच्या आई आणि कतरिनामध्ये नक्कीच एक खूप छान नात आहे. अनेक प्रसंगांमधून ते दिसूनही येतं.

या दोघींमध्ये घट्ट बॉंड असून विकीच्या आई सुनेला अगदी मुलीसारखच प्रेम करतात. कतरिनाला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा ती सासूसोबत खूप वेळ व्यथित करते. त्या दोघी काही दिवसांपूर्वीच शिर्डीच्या मंदिरात गेल्या होत्या.

कतरिनाच्या केसांसाठी बनवतात स्पेशल तेल

सासूबाई आपले खाण्याच्या बाबतीत तेसच इतर गोष्टींमध्येही किती लाड करतात याबदद्ल बऱ्याचदा मुलाखतींमध्येही कतरिना सांगताना दिसते. त्यांचं कौतुक करताना दिसते. एवढच नाही तर त्या कतरिनाच्या केसांची मालिश करून देतात आणि त्यासाठी एक खास तेलही घरी बनवतात. याचा खुलासा स्वत: कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

या मुलाखतीमध्ये कतरिनाला तिच्या स्किनकेयरविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा तिने सांगितले की, ‘मला स्किनकेयर खूप आवडतं कारण माझी त्वचा ही खूप सेंसेटिव्ह आहे. मला गुआ शा ( त्वचेला चांगली ठेवण्यासाठी असलेली चायनीज टेकनीक) खूप आवडते. मला हे माहित आहे की त्यासाठी खरं तर मी खूप उशिर केला आहे. मी आताच ते करण्यास सुरुवात केली आहे.’

सासूबाई करत असलेल्या तेलाची रेसिपी 

पुढे हेअर केअर विषयी सांगताना कतरिना म्हणाली, ‘माझ्या सासूबाई माझ्यासाठी कांदा, आवळा, अ‍ॅव्होकाडो आणि त्यात आणखी दोन-तीन गोष्टी टाकून केसांना लावण्यासाठी तेल बनवताच. त्याशिवाय घरगूती उपाय देखील खूप चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे माझ्या केसांचे सौंदर्य अजूनही टीकून असल्याचं कतरिना म्हणाली.’

दरम्यान, कतरिनाला तिचे सासू-सासरे किट्टो म्हणून हाक मारतात. कतरिना ही नेहमीत तिच्या सासू-सासऱ्यांचं कौतुक करताना दिसते. 2022 मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये कतरिनानं सांगितलं होतं की सासूबाई तिच्या स्पेशल डायटवर देखील लक्ष ठेवतात. त्याशिवाय कतरिनानं तिचा नवरा विकी कौशलची देखील अनेकदा स्तुती केली आहे.

तिनं सांगितलं होतं की विकी हा खूप समजुतदार आणि सांभाळून घेणारा आहे. कतरिना आणि विकीनं काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 9 डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. दरम्यान, कतरिना अनेकदा तिच्या सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवताना आणि त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते.