कन्नड सुपरस्टार यशच्या (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF Chapter 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच धमाका केला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. KGF2च्या हिंदी व्हर्जनने बंपर कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांना पछाडलं आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात 134.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईच्या आकड्याची माहिती दिली आहे. ‘वॉर’, ‘ठग्स ऑफि हिंदोस्तान’ यांसारख्या चित्रपटांना KGF2 ने मागे टाकलं आहे. केजीएफ: चाप्टर 1 नंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. (KGF Chapter 2 Box Office Collection)
केजीएफ 2- 53.95 कोटी रुपये
वॉर- 50.75 कोटी रुपये
ठग्स ऑफ हिंदोस्तान- 50.75 कोटी रुपये
‘KGF2’ CREATES HISTORY, BIGGEST DAY 1 TOTAL… #KGF2 has demolished *opening day* records of #War and #ThugsOfHindostan… #KGFChapter2 is now BIGGEST OPENER in #India [#Hindi version]… *Day 1* biz…
⭐️ #KGF2: ₹ 53.95 cr
⭐️ #War: ₹ 51.60 cr
⭐️ #TOH: ₹ 50.75 cr
Nett. #India biz. pic.twitter.com/XES04m8HTe— taran adarsh (@taran_adarsh) April 15, 2022
‘KGF2’ DAY 1: ₹ 134.50 CR… #KGF2 has smashed ALL RECORDS on Day 1… Grosses ₹ 134.50 cr Gross BOC [#India biz; ALL versions]… OFFICIAL POSTER ANNOUNCEMENT… pic.twitter.com/ZB0NVJMKBR
— taran adarsh (@taran_adarsh) April 15, 2022
यशच्या केजीएफ- चाप्टर 1 या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा लाइफटाइम बिझनेस 44.09 कोटी रुपये इतका झाला होता. हा आकडा यशच्या केजीएफ- चाप्टर 2ने पहिल्याच दिवशी पार केला आहे. कमाईचा हा आकडा पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपटांचे विक्रम मोडणार, यात काही शंका नाही.
ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचाही विक्रम मोडला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे चार दिवस राहिले असताना केजीएफ 2च्या हिंदी व्हर्जनची जवळपास 11 कोटी रुपयांची तिकिटं विकली गेली होती. या तुलनेत RRRच्या हिंदी व्हर्जनचं फक्त 5 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कन्नड चित्रपटाने उत्तर भारतात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली.
हेही वाचा:
VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका
The Kashmir Filesच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; आता बनवणार The Delhi Files