मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : साऊथ सुपरस्टार यश सध्या तुफान चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेत्याला एका किराणा दुकानात स्पॉट करण्यात आलं. सध्या यश याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये फक्त यश नाही तर, अभिनेत्याची पत्नी देखील दिसत आहे. सांगायचं झाल तर, यश याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेता गडगंज श्रीमंत देखील आहे. असं असून सुद्धा अभिनेता अत्यंत साधं आयुष्य जगतो. अभिनेत्याचा साधा स्वभाव चाहत्यांना देखील प्रचंड आवडतो.
सोशल मीडियावर ‘केजीएफ’ स्टार यश याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये यश किराणा दुकानात खरेदी करताना दिसत आहे. अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील यश याच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यश याची चर्चा रंगली आहे.
Rocking Star Yash purchases ice candy for his wife Radhika from a small grocery shop.
Despite huge stardom, #Yash remains simple and humble
This is during their recent… pic.twitter.com/YTRW6av6xJ
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) February 17, 2024
आतापर्यंत तुम्ही कोणत्याच सेलिब्रिटीला किराणा दुकानात खरेदी करताना पाहिलं नसेल. पण यश कायम किराणा दुकानातून खरेदी करतो. आता अभिनेता एक टॉफी घेण्यासाठी किराणा दुकानात पोहोचला होता. रॉयल आयुष्य जगणाऱ्या यश याला किराणा दुकानात पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा आनंद झाला आहे.
अभिनेता यश नुकताच त्याच्या कुटुंबासह शिराली येथील भटकळ येथील त्रिपुरा मठ मंदिरात गेला होता. येथे चाहत्यांनी अभिनेत्याला स्थानिक किराणा दुकानाबाहेर पाहिले, जिथे यश त्याची पत्नी राधिकासाठी आईस कँडी विकत घेत होता. आपल्या पत्नीसाठी केलेल्या या छोट्याशा प्रेमळ कृतीमुळे यशच्या चाहत्यांना देखील प्रचंड आनंद झाला.
यश याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ चॅप्टर 2’ सिनेमानंतर यश याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. आता यश ‘टॉक्सिन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात यश याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. चाहते देखील यश याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.